मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह

मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह

“७० वर्षे इथे राहिल्यानंतरही मी या देशाचा नागरिक आहे, हे सिद्ध होऊ शकत नसेल, तर आणखी कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होईल,”  असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिने

सत्तेसाठी युतीमध्ये कलगीतुरा
केविलवाणा भाजप आणि राष्ट्रवादीची हवा
उर्मिला मातोंडकर, कृपाशंकरसिंह यांचा काँग्रेसचा राजीनामा

“७० वर्षे इथे राहिल्यानंतरही मी या देशाचा नागरिक आहे, हे सिद्ध होऊ शकत नसेल, तर आणखी कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होईल,”  असा संतप्त सवाल ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला. मी घाबरलेलो नाही, पण मला प्रचंड चीड आली आहे, असे सांगत त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत आपला तीव्र रोष व्यक्त केला. नसिरुद्दीन शाह यांनी ‘द वायर’ला मुलाखत दिली. ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ भाटीया यांनी त्यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये शाह यांनी सीएए, एनआरसी, देशामध्ये वाढणारी धर्मांधता आणि बॉलीवूडमधील मोठे अभिनेते का गप्प आहेत, याबद्दल परखडपणे आपली मते व्यक्त केली.

सीएए या कायद्याच्या विरोधात तरुण लोक रस्त्यावर येत असून, बॉलीवूडमधील तरुण लोक या विरोधात बोलत आहेत, मात्र वलयांकीत कलाकार यावर मौन बाळगून आहेत. मला त्याचे आश्चर्य वाटत नाही. आपण विरोध केल्यास आपल्याला बरेच काही गमवावे लागेल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असेल. मला या सर्वात कौतुक वाटते ते दीपिकाचे. तिने कशाचीही तमा न बाळगता जेएनयूमधील विद्यार्थ्यांची साथ दिली. विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरुद्ध ती उभी राहिली,  असे शाह म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि बुद्धिजीवीच्या संदर्भात असंवेदनशीलता दाखवत असून कदाचित विद्यार्थिदशेतून गेलेले नसल्याने ते असे वागत असावेत, असेही शाह म्हणाले. अनुपम खेर या मुद्दय़ावर फारच पुढाकार घेताना दिसत असून एनएफडीसी आणि एनएफटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असल्याच्या काळापासून अनुपम खेर हे मनोरुग्ण असल्याचे सर्वाना माहिती आहे. हा गुण त्यांच्या रक्तातच असल्याचेही शाह म्हणाले.

“जे लोक या कायद्याचे समर्थन करत आहेत त्यांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. आपण कशाचे समर्थन करत आहोत, याचे भान राखले पाहिजे. आम्हाला आमची जबाबदारी काय, हे कुणी सांगण्याची गरज नाही. ती आम्हाला चांगली ठाऊक आहे. मी मुस्लीम म्हणून नाही, तर देशाचा एक समंजस नागरिक म्हणून ही भूमिका घेत आहे”, असे शाह म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: