त्रिभाषा शिक्षण धोरणाला तामिळनाडूचा विरोध

त्रिभाषा शिक्षण धोरणाला तामिळनाडूचा विरोध

चेन्नईः मोदी सरकारच्या नव्या राष्ट्रीय धोरणातील त्रिभाषा सूत्रीला तामिळनाडू राज्याने विरोध केला आहे. आमच्या राज्यात तामिळ व इंग्रजी असे द्विभाषिक शिक्

पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
वैद्यकीय पदवी परीक्षा १० जूनपासून होणार

चेन्नईः मोदी सरकारच्या नव्या राष्ट्रीय धोरणातील त्रिभाषा सूत्रीला तामिळनाडू राज्याने विरोध केला आहे. आमच्या राज्यात तामिळ व इंग्रजी असे द्विभाषिक शिक्षण धोरणच चालेल असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री निशंक यांनी कोणत्याही राज्यावर केंद्र सरकारकडून भाषा थोपवण्यात येणार नाही, असे विधान केले होते. त्यावर पलानीस्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पलानीस्वामी यांनी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण पीडादायक वाटत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्रिभाषा सूत्रावर पुन्हा विचार करावा अशीही विनंती केली आहे. तामिळनाडू या राज्यात अनेक दशके द्विभाषिक धोरण राबवले गेले आहे, त्यामुळे आमचे राज्य शिक्षणातील द्विभाषिक धोरणाबाबत कोणताही बदल करणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी व संस्कृत भाषा मुलांवर थोपवली जात असल्याच्या कारणावरून तामिळनाडूत विरोध सुरू झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने व अन्य विरोधी पक्षांनी या प्रश्नी रस्त्यावर येण्याची तयारी दाखवली आहे. यावर निशंक यांनी प्रत्येक राज्याला त्यांची भाषा निवडण्याचा अधिकार दिल्याचे स्पष्ट करावे लागले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: