नथुरामला दाखवले संघस्वयंसेवकाच्या वेषात

नथुरामला दाखवले संघस्वयंसेवकाच्या वेषात

जबलपूर : म. गांधी यांच्या २ ऑक्टोबर रोजी झालेल्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहरातील स्मॉल वंडर्स सीनियर सेंकडरी स्कूल या शाळेने आयोजित केलेल्या एका मूक ल

महात्म्याचा वारसा
‘सत्याचे प्रयोग’ ही संजीवनी
नेहरूंविना भारताचे काय झाले असते

जबलपूर : म. गांधी यांच्या २ ऑक्टोबर रोजी झालेल्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहरातील स्मॉल वंडर्स सीनियर सेंकडरी स्कूल या शाळेने आयोजित केलेल्या एका मूक लघुनाट्यात म. गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेषात दाखवल्याने वाद निर्माण झाला.

हे नाटक ज्युनियर वर्गातल्या मुलांनी बसवले होते व एका प्रसंगात म. गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे याची वेशभूषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची दाखवण्यात आली होती. या वेशभूषेवर यतींद्र उपाध्याय या आरएसएस कार्यकर्त्याने आक्षेप घेतला व शाळेविरोधात लॉर्डगंज पोलिस ठाण्यात केली. उपाध्याय यांनी आपल्या फिर्यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलिन करण्याचा शाळेचा हा प्रयत्न असून नथुराम गोडसेचा आरएसएसशी कोणताही संबंध नसल्याचा आणि आरएसएसचाही गांधी हत्येशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.

या घटनेवर वाद निर्माण झाल्यानंतर स्मॉल वंडर्स सीनियर सेकंडरी स्कूल या शाळेने फेसबुक या सोशल मीडियावर झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली. हे नाटक मूक नाटक होते व ते शिशू वर्गाने बसवले होते. गोडसेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्दीत दाखवणे ही आमची एक चूक होती आणि त्यामागे कोणताही राजकीय विचार नव्हता. गोडसेचे आरएसएसशी काही संबंधही नव्हते, आमच्याकडून मात्र अनवधानाने ही चूक झाली असा माफीनामा या शाळेने जाहीर केला.

शाळेच्या संचालकांनी नंतर आपला लिखित माफीनामा आरएसएसच्या शहरातील कार्यालयात जाऊन दिला आणि तो आरएसएसने स्वीकारल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0