अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबावणी संचालनालयाने (ईडी) ने दुपारी अटक केली. त्यांना वैद्यक

नॅशनल हेराल्डच्या मुंबईतल्या मालमत्तेवर ईडीची टाच
ईडीच्या संचालकांना १ वर्षांची मुदतवाढ
‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबावणी संचालनालयाने (ईडी) ने दुपारी अटक केली. त्यांना वैद्यकीय तपासणी साठी नेण्यात आले असून त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.

जुन्या मालमत्ता प्रकरणामध्ये नवाब मलिक यांची आज सकापासूनच ईडीतर्फे चौकशी सुरू होती. ईडीचे पथक पहाटेच त्यांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयामध्ये नेण्यात आले होते. सकाळी सात वाज्यापासूनच त्यांची कार्यालयामध्ये चौकशी सुरू करण्यात आली होती. आठ तासांच्या चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली.

चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्विट करून आपण झुकणार नाही, असे संकेत दिले होते. त्यामुळेच नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. यानंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. ‘लढेंगे और जितेंगे’, असे त्यांनी म्हटले.

वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर थोड्याचवेळात नवाब मलिक यांना मुंबई सेशन्स कोर्टात हजर केले जाईल. याठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल.

”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू”, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला होता.

नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ विरोधी संचालनालयाचे संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप केले होते. तेंव्हापासून मलिक हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर होते.

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0