ग़डचिरोलीत पोलिस चकमकीत २६ माओवादी ठार

ग़डचिरोलीत पोलिस चकमकीत २६ माओवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पोलिस व माओवादी चकमकीत २६ माओवादी ठार व ४ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चकमकीत ठार झाल

जगात कोरोनाचे ६ कोटीहून अधिक रुग्ण
गुजरात : पोलिस अधिकारी श्रीकुमार यांना जामीन
२०१९ अर्थसंकल्प : एक बाण, लक्ष्य अनेक

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी झालेल्या पोलिस व माओवादी चकमकीत २६ माओवादी ठार व ४ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. चकमकीत ठार झालेल्या २६ माओवाद्यांचे मृतदेह पोलिसांना मिळाले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख अंकित गोयल यांनी दिली. ठार मारलेल्या माओवाद्यांमध्ये सीपीआय (माओवादी) सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण पोलिसांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. रविवारी मृतदेहांची संपूर्ण ओळख पटवली जाईल त्यानंतर अधिक माहिती मिळेल, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. या चकमकीत तेलतुंबडे याचा अंगरक्षक राकेश शरण आला आहे, त्याच्या मदतीने तेलतुंबडेंची ओळख पटवली जाईल असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मिलिंद तेलतुंबडे हा भीमा-कोरेगाव खटल्यातील एक आरोपी व दलित विचारवंत आनंद तेलतुंबडे यांचा धाकटा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे याच्याकडे माओवाद्यांच्या महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड भागाची सूत्रे आहेत.

माओवाद्यांविरोधातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी नेता सुखलाल याच्या कोरची दलामचे सदस्य लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माओवाद्यांचा ठिकाणा शोधला. या कारवाईत पोलिसांच्या मदतीला सी-६० कमांडो दलाच्या १६ तुकड्या सामील झाल्या होत्या. प्रत्येक तुकडीत १०० कमांडो असतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.

माओवाद्यांविरोधातील ही मोहीम सकाळी ६ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू होती. गेल्या काही महिन्यातील माओवाद्यांविरोधातली ही सर्वात मोठी कारवाई होती.

या चकमकीत जखमी झालेले रवींद्र नैताम (४२), सर्वेश्वर अत्राम (३४), माहरु कुडमेथे (३४) व तिकराम कटांगे (४१) या पोलिस कर्मचार्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0