कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ

कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ

नवी दिल्लीः देशातील विविध राज्यांकडून ५ जूनपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोविड-१९ महासाथीत देशभरात ३०,०७१ मुलांनी आपले आई-वडील किंवा दोन्हीपैकी एक पाल

ब्रेक दि चेन निर्बंधः आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे
पीएम केअर फंड एनआरआय, विदेशी देणगीदारांसाठी खुला
मुंबईत कोरोनाचा विस्फोटः २०,१८१ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्लीः देशातील विविध राज्यांकडून ५ जूनपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोविड-१९ महासाथीत देशभरात ३०,०७१ मुलांनी आपले आई-वडील किंवा दोन्हीपैकी एक पालक गमावल्याची माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

कोविडच्या महासाथीत २६,१७६ मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला तर ३,६२१ मुलांनी आपल्या आईवडिलांना गमावले तर २७४ मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी दूर लोटले असे एनसीपीसीआरचे म्हणणे आहे.

१ एप्रिल २०२० ते ५ जून २०२१ या काळात देशातील अनाथ मुलांची माहिती बाल स्वराज पोर्टलवर जाहीर केली आहे. या पोर्टलवर मुलांच्या पालकांच्या मृत्यूचे कारण मात्र दिलेले नाही.

कोविड-१९च्या महासाथीत देशात सर्वाधिक अनाथ मुलांची आकडेवारी महाराष्ट्रात नोंदली गेली असून ती ७,०८४ इतकी आहे. त्यानंतर उ. प्रदेश ३,१७२, राजस्थान २,४८२, हरियाणा २,४३८, म. प्रदेश २,२४३, आंध्र प्रदेश २,०८९, केरळ २,००२, बिहार १,६३४ व ओदिशा १,०७३ इतकी नोंदली गेली आहे.

अनाथ झालेल्यांमध्ये मुलींची संख्या १४,४४७ तर मुलांची संख्या १५,६२०, भिन्नलिंगी ४ जणांचा समावेश असून ८ ते १३ वयोगटातील मुलांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील ११,८१५ मुलांचे आई किंवा वडील किंवा दोन्ही पालक कोरोना साथीत मरण पावलेले असल्याचे एनसीपीसीआरच्या आकडेवारीत म्हटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0