नेहरु, अटल देशाचे आदर्श नेतेः गडकरी

नेहरु, अटल देशाचे आदर्श नेतेः गडकरी

नवी दिल्लीः देशाची पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देशाचे आदर्श नेते असून सर्व राजकीय पक्षांनी आत्मनिरीक्षण करत लोकशाही मूल्ये, संकेताचे पालन करण्याची गरज आहे असे मत केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीश गडकरी यांनी ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात व्यक्त केले.

नेहरू व वाजपेयी हे हिंदुस्तानचे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही लोकशाही मूल्यांचे, संकेतांचे पालन करत राहू असे म्हणत असतं. नेहरूंनी लोकशाहीसाठी मोठे प्रयत्न केले. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे, असेही ते म्हणाले.

गडकरी यांनी या निमित्ताने महाराष्ट्र विधान सभेत ते विरोधी पक्षाचे नेते असतानाचा अनुभव सांगितला. विधानसभेत आम्ही रोज सरकारच्या विरोधात गोंधळ घालायचो. त्याच्या दुसर्या दिवशी ठळक बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हायच्या. त्या दरम्यान मुंबईतल्या घाटकोपरमधील एका उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांना बोलावण्यात आले. त्या वेळी त्यांच्या गाडीत मी बसलो होते. अटलजींच्या हातात वर्तमानपत्रे होती. ती पाहून ते म्हणाले, ‘नितीनजी हे तुम्ही सगळं काय करता आहात? हे योग्य नव्हे. तुम्हाला तुमचे म्हणणे जनतेपुढे नेता आले पाहिजे. लोकशाहीत असा गोंधळ करणे हा योग्य मार्ग नव्हे.’

गडकरी पुढे म्हणाले, सत्ताधारी व विरोधकांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आज सत्तेतले असलेले उद्या विरोधी पक्षांच्या बाकावर असू शकतात. लोकशाही सदृढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. लोकशाहीत राजकीय पक्षांचे योगदान महत्त्वाचे असते. त्यांची जबाबदारी बदलत असते. मी माझ्या राजकीय आयुष्यातील अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिलो आहे. प्रत्येकाला शिस्त अंगी बाळगावी लागेल, असे गडकरी म्हणाले.

लोकशाही यशस्वी करायची असेल तर सत्ताधार्यांबरोबर विरोधी पक्षही मजबूत असले पाहिजे. लोकशाही दोन पायांची गाडी आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष. जर विरोधी पक्ष मजबूत असेल तर त्यांचा सत्ताधार्यांवर अंकुश असतो. नेहरू नेहमीच वाजपेयींचा आदर करत होते व ते विरोधी पक्षाची लोकशाहीला गरज आहे, असे म्हणत असतं. काँग्रेसने एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभे राहिले पाहिजे व जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केले पाहिजे. त्यांना माझ्या शुभेच्छा अशा भावना गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मूळ बातमी

COMMENTS