न्यूझीलंडच्या संघाची पाकिस्तानातून माघार

न्यूझीलंडच्या संघाची पाकिस्तानातून माघार

न्यूझीलंड क्रिकेट संघ अनेक वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मात्र खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत दौरा पुढे ढकलल्याचे न्यूझीलंड क्र

खेळपट्टी की आखाडा
भारतीय संघाचे चुकले कुठे?
न्यूझीलंडनंतर, इंग्लंडचीही पाकिस्तानातून माघार

न्यूझीलंड क्रिकेट संघ अनेक वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. मात्र खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत दौरा पुढे ढकलल्याचे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती. त्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट संघ सुमारे १८ वर्षानंतर क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. मात्र पुन्हा एकदा खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देऊन न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दौरा स्थगित केला आहे. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी )संतापले आहे.

१७ सप्टेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेतील पाहिला एकदिवसीय सामना होणार होता. सकाळपासून दोन्ही संघ हॉटेलमध्ये थांबले होते. प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला गेला नव्हता. मात्र अचानक दौरा स्थगित करण्यात आल्याची घोषणा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केली. “न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आम्ही हमी दिली होती. मात्र त्यांनी एकतर्फी निर्णय घेत मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. सामने नियोजनानुसार सुरु ठेवण्यासाठी पीसीबी सज्ज आहे. मात्र पाकिस्तान आणि जगभरातील क्रीडाप्रेमी शेवटच्या क्षणाला मालिका स्थगित केल्याने निराश होतील”, असे ट्विट पीसीबीने केले आहे.

न्यूझीलंड संघाशी निगडीत सुरक्षेबाबत काही सूचना न्यूझीलंडला मिळाल्या होत्या. त्यानुसार दौरा स्थगित करून पुढे ढकलण्याचा न्यूझीलंडने निर्णय घेतला. आता न्यूझीलंड संघाला  पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.

“आम्हाला दिलेल्या सल्ल्यानुसार दौरा सुरु ठेवणं शक्य नव्हते. पीसीबीसाठी हा धक्का असला, तरी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. असे मत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे सदस्य डेविड व्हाइट यांनी व्यक्त केले.

अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर पाकिस्तानातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे न्यूझीलंडने माघार घेतली आहे. काहीच दिवसांत इंग्लंडचा संघही पाकिस्तान दौरा करणार आहे. त्या दौऱ्यावरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला होता. लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. त्याचवेळी  न्यूझीलंडचा संघही पाकिस्तानात मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचे कळताच न्यूझीलंडचा संघ रस्त्यातूनच मायदेशी परतला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0