शेतकरी आंदोलन: कार्यकर्ते आणि टीव्ही पत्रकाराला एनआयएची नोटिस

शेतकरी आंदोलन: कार्यकर्ते आणि टीव्ही पत्रकाराला एनआयएची नोटिस

गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)कडून किमान १३ लोकांना नोटीसा पाठविल्या आहेत. यामध्ये शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा, पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ते दीप सिंधू, पंजाबमधील टीव्ही पत्रकार जसबीर सिंह आणि कार्यकर्ते गुरप्रीत सिंग यांचा समावेश आहे.

विना मास्क दंडः गुजरातची २५२ कोटी रु.ची वसूली
वसाहतवादविरोधी भारतीयांनी पॅलेस्टाइनला पाठिंबा दिलाच पाहिजे!
बोचरा थट्टापट : बोराट

नवी दिल्ली: मोदी सरकारने आणलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनादरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आंदोलनात सहभागी लोकांना आणि पाठिंबा दर्शविणाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे.

एनआयएकडून नोटीस मिळालेल्यांमध्ये शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा, पंजाबी अभिनेता आणि कार्यकर्ते दीप सिंधू, पंजाबमधील टीव्ही चॅनेलचे पत्रकार जसबीर सिंग आणि कार्यकर्ते गुरप्रीत सिंग यांचा समावेश आहे.

बंदी घातलेली संघटना ‘शीख फॉर जस्टिस’ यांच्याविरोधात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या एका एफआयआरच्या संदर्भात चौकशी एजन्सीने या नोटीसा पाठवल्या आहेत.

कृषी कायद्यांबाबत सरकारशी चर्चेत सहभागी असलेल्या पब्लिक वेलबिंइंग इंसाफ वेलफेयर सोसायटीचे अध्यक्ष बलदेवसिंग सिरसा यांना १७ जानेवारीला ‘एनआयए’च्या मुख्यालयात बोलवण्यात आले आहे.

सिख फॉर जस्टिस, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान टायगर फोर्स आणि खलिस्तान जिंदाबाद फोर्स यांच्यासह इतर खलिस्तानी संघटनांनी लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी आणि भारत सरकारविरोधात बंड पुकारण्यासाठी दहशत व अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा कट रचला असल्याचा आरोप एनआयएने केला आहे.

पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिंधू यांनाही रविवारी एनआयएसमोर हजर राहण्यास सांगितले गेले आहे. यापूर्वी याच प्रकरणात त्यांचा भाऊ आणि किमान डझनभर जणांना एनआयएकडून नोटीस मिळाली होती.

ब्रिटिशस्थित पंजाब टाईम्सचे पत्रकार बलविंदर पाल सिंग यांनाही १७  जानेवारीला एनआयएच्या मुख्यालयात हजर होण्यासाठी नोटिस देण्यात आली आहे.

केटीव्ही यूकेशी संबंधित मुक्तासारचे पत्रकार जसवीर सिंह यांनाही १८ जानेवारीला एनआयएसमोर हजर राहण्यास सांगितले गेले आहे.

गेल्या काही दिवसांत एनआयएकडून किमान १३ लोकांना नोटीसा पाठविल्या गेल्या आहेत. शुक्रवारी सरकारशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी नेत्यांनीही ही बाब चर्चेत उपस्थित केली होती.

एनआयएकडून नोटिसा मिळालेल्यांमध्ये कर्नाल सिंग आणि होशियारपूरचे नोबेलजीत सिंग, बरनालचे सुरिंदरसिंग कुक्रीवाल, इंद्रपालसिंग न्यायाधीश आणि लुधियानाचे परदीप सिंग, मोगाचे पल्विंदरसिंग, परमजीत सिंग आणि अमृतसरचे रणजित सिंह यांचा समावेश आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0