नवी दिल्लीः गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या २,९८८ कि.ग्रॅ. वजनाच्या अमली पदार्थ प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या ताब्यात घ
नवी दिल्लीः गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या २,९८८ कि.ग्रॅ. वजनाच्या अमली पदार्थ प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या ताब्यात घेतला आहे. बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात एक आदेश जाहीर करत मुंद्रा बंदरात तस्करीतून पकडलेला अंमली पदार्थाचा तपास एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत एनआयएकडे तपासासाठी देत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले माछावरम सुधाकरन, दुर्गा पीव्ही गोविंदराजू, राजकुमार पी व अन्य काहींवर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंद्रा बंदरात सापडलेला अंमली पदार्थाच्या साठ्याचा संबंध दहशतवादी गटाशी असल्याचे दिसत असल्याने या प्रकरणात तालिबान-पाकिस्तानचा हात असल्याचा संशय असल्याने एनआयएकडे तपास दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंद्रा बंदरात सापडलेल्या २,९८८.२१ किलो ग्रॅम अंमली पदार्थाचा साठा अफगाणिस्तानातून तस्करी करत इराणच्या बंदर अब्बास बंदरातून गुजरातमध्ये आल्याचे गृहखात्याचे म्हणणे आहे.
मूळ बातमी
COMMENTS