‘आरोग्य सेतू’ : माहितीच नाही !

‘आरोग्य सेतू’ : माहितीच नाही !

नवी दिल्लीः कोरोना महासाथीत काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक केलेल्या केंद्र सरकारचे आरोग्य सेतू ऍप हे कोणी तयार केले आहे, त्याची माहिती खुद्द सरकारलाच नस

‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
राज्यातल्या १५ लाख शेतकऱ्यांकडे ई- पीक पाहणी ॲप
पबजीसह ११८ चिनी अॅपवर बंदी

नवी दिल्लीः कोरोना महासाथीत काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक केलेल्या केंद्र सरकारचे आरोग्य सेतू ऍप हे कोणी तयार केले आहे, त्याची माहिती खुद्द सरकारलाच नसल्याचा खुलासा एका माहितीच्या अधिकारातून झाला खरा. त्यानंतर मंगळवारी केंद्रीय माहिती आयोगाने नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) कडून त्या संदर्भातले उत्तर मागवले होते. एनआयसीकडे आरोग्य सेतू ऍपची माहिती कशी नाही, अशी विचारणाही करण्यात आली होती. तसेच या एकूण प्रकरणाच्या माहितीसाठी नॅशनल इ-गव्हर्नन्स डिव्हिजन, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, माहिती व तंत्रज्ञान खाते या अन्य खात्यांना नोटीसा पाठवल्या होत्या.

या सर्व खात्यांनी अर्जदाराच्या प्रश्नांना उत्तरे देताना टोलवा टोलवी केली, माहिती देण्याचे टाळले, जबाबदारी टाळली असेही आक्षेप केंद्रीय माहिती आयोगाने नोंदवले आहेत. संबंधित अधिकार्यांवर कारवाई का करू नये, अशीही विचारणा केली होती.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने बुधवारी स्पष्टीकरणात सांगितले की, आरोग्य सेतू ऍप हे सार्वजनिक व खासगी सहकार्यातून तयार केले असून ते करण्याची प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे. हे ऍप कोविड-१९ची परिस्थिती पाहता केवळ २१ दिवसांत तयार केले गेले. या ऍपविषयी कोणीही संशय बाळगू नये, या ऍपमुळे कोविडची साथ रोखण्यात सरकारला यश आले आहे. असे एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

नेमके प्रकरण काय?

कोरोना महासाथीच्या काळात देशातील कोट्यवधी नागरिकांनी आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाइल फोनमध्ये डाऊनलोड केले होते. या माहितीची चोरी होईल किंवा ही संबंधित नागरिकाची व्यक्तिगत माहिती असून सरकार हे ऍप डाऊनलोड करण्यास सक्ती करू शकत नाहीत, असे प्रश्न उपस्थित झाले होते. तरीही कोट्यवधी नागरिकांना हे ऍप सरकारच्या धास्तीमुळे डाऊनलोड करावे लागले. हे ऍप कोरोना बाधित रुग्णांची माहिती ठेवण्याबरोबर काँटॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करत होते, या संदर्भात एका माहिती अधिकारातून या ऍपच्या डेव्हलपरची माहिती केंद्र सरकारकडून मागवली होती. पण या अर्जाचे उत्तर म्हणून देण्यात आलेली माहिती ही शुद्ध टोलवाटोलवी होती असे केंद्रीय माहिती आयोगाचे म्हणणे आहे.

कोरोना महासाथ देशात वेगाने पसरत असताना केंद्र सरकारने आरोग्य सेतू ऍपची सक्ती सुरू केली होती. तसेच या ऍपची उपयुक्तता जाहिरातींमधून केली गेली होती. या ऍपच्या वेबसाइटवर हे ऍप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर व आयटी मंत्रालयाने तयार केल्याचे सांगितले जात होते पण या ऍपच्या संदर्भात सौरव दास यांनी माहिती अधिकार अर्ज दाखल केला असता या अर्जात त्यांनी या ऍपचा प्रस्ताव कुणी व केव्हा दिला, त्याला मंजुरी कुणी दिली, या मंजुरीचा सर्व तपशील, हे ऍप तयार करणार्या कंपन्यांची नावे, त्यातील तंत्रज्ञांचे नावे यांची माहिती मागवली होती. पण दोन्ही संस्थांनी या ऍपचा डेव्हलपर कोण आहे याची माहिती आपल्याकडे नसल्याचे सांगितले व कोणतीही माहिती देण्यास असमर्थता दाखवली.

एनआयसीने या ऍपच्या निर्मितीसंदर्भातील फाईल आमच्याकडे नसल्याचे अनेकवेळा सांगितले. तर आयटी मंत्रालयाने हा माहिती अर्ज नॅशनल इ-गव्हर्नन्सकडे पाठवला. त्यांनी या अर्जात मागवलेली माहिती आमच्याशी संबंधित नसल्याचे उत्तर दिले.

त्यानंतर सौरव दास यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार करत आरोग्य सेतू ऍप कोणी तयार केले आहे, याची माहिती सार्वजनिक केली जावी अशी मागणी केली. सौरव दास यांचा केंद्रीय माहिती आयोगाकडे दाखल केलेला तक्रार अर्जही दोन महिने एका सरकारी खात्याकडून दुसर्या सरकारी खात्याकडे फिरवला जात होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0