पिगॅसस हेरगिरीची चौकशी हवीः नितीश कुमार

पिगॅसस हेरगिरीची चौकशी हवीः नितीश कुमार

नवी दिल्लीः केंद्रातील व बिहारमधील सत्ताधारी एनडीएमधील प्रमुख घटक जनता दल संयुक्तचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पिगॅसस हेरगिरी प्रकरण

नितीशकुमार दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी उपमुख्यमंत्री
माझी अखेरची निवडणूकः नितीश कुमार
बिहारच्या यशानंतर एमआयएमचे लक्ष्य पक्षविस्ताराकडे

नवी दिल्लीः केंद्रातील व बिहारमधील सत्ताधारी एनडीएमधील प्रमुख घटक जनता दल संयुक्तचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी सोमवारी मागणी केली. नितीश कुमार हे भाजपप्रणित एनडीए घटक पक्षातील पहिले नेते आहेत की ज्यांनी पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची मागणी केली आहे.

गेले दोन आठवडे संसदेचे अधिवेशन पिगॅसस प्रकरणावरून ठप्प असून सर्व विरोधी पक्ष संसदीय समितीकडे किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे हे प्रकरण चौकशीसाठी द्यावे अशी सातत्याने मागणी करत आहेत. पण ही मागणी सरकारने संसदेच्या दोन्ही सदनात व संसदेच्या बाहेरही फेटाळली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा जुना मित्र असलेल्या जनता दल संयुक्तने चौकशीची मागणी केल्याने भाजपपुढे राजकीय अडचण उभी राहिली आहे.

सोमवारी नितीश कुमार म्हणाले, पूर्वीपासून टेलिफोन टॅप होण्याची प्रकरणे ऐकत आलो आहोत. त्यामुळे पिगॅसस हेरगिरी प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे. वर्तमानपत्रात, संसदेत अशा प्रकरणांच्या चौकशीची वृत्ते येत असताना त्याची सर्वांगिण चौकशी व्हायला हवी. चौकशीतून सत्य पुढे आले पाहिजे. पण चौकशीत कुणाला त्रास देण्याचे प्रयत्न होऊ नयेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0