केरळ सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला

केरळ सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला

तिरुवनंतपूरमः केरळमधील एलडीएफ या सत्ताधारी डाव्या आघाडीच्या विरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने आणलेला अविश्वासाचा प्रस्ताव ८७ विरुद्ध ४० मतांनी फेटाळला.

महाराष्ट्रातल्या सत्तेची सूत्रे दिल्लीतून फिरतात तेव्हा..
आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
अहमद पटेल: सोनियांच्या विश्वासातील सुक्ष्मविवेकी नेते

तिरुवनंतपूरमः केरळमधील एलडीएफ या सत्ताधारी डाव्या आघाडीच्या विरोधात काँग्रेसप्रणित यूडीएफने आणलेला अविश्वासाचा प्रस्ताव ८७ विरुद्ध ४० मतांनी फेटाळला. हा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होण्याची वाट पाहात असून ते भाजपचे एजंट असल्याची खरमरीत टीका केली. त्यांनी काँग्रेस ही भाजपची बी टीम असल्याचाही आरोप केला.

सोमवारी केरळ विधानसभेत सुमारे ९ तास चर्चा झाली. यानंतर मतदान होऊन ८७ विरुद्ध ४० मतांनी हा प्रस्ताव फेटाळला गेला. कोविड-१९ महासाथीमुळे मतदान करताना पारंपरिक पद्धत वापरली गेली. प्रत्येक आमदाराचे नाव पुकारून अविश्वास ठरावाला त्याचा पाठिंबा आहे की नाही, असे विचारून मतमोजणी करण्यात आली.

अविश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री विजयन यांनी काँग्रेसचे सदस्य भाजपचे एजंट असल्याचा आरोप केला. भाजपमध्ये जाण्यासाठी हे आमदार वाट पाहात असून काँग्रेसने सेक्युलर भूमिका केव्हाच सोडली आहे आता या पक्षाची प्रतिमा भाजपची बी टीम अशी झाल्याचा आरोप त्यांनी केला. विजयन यांनी काँग्रेसमधील नेतृत्वप्रश्नाचाही उल्लेख केला. या पक्षात गांधी कुटुंब विरुद्ध अन्य अशी फूट पडल्याचे ते म्हणाले.

केरळमध्ये काँग्रेसने मुस्लिम लीग, भाजपशी संगनमत केले असून जमाते ए इस्लामीने काँग्रेस, इंडियन युनियन मुस्लिम लीग व आरएसएसला आपल्या अंकित केले आहे, असाही आरोप त्यांनी केला.

१४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डावे प्रणित एलडीएफचे ९३ आमदार असून काँग्रेसप्रणित यूडीएफचे ४५ व भाजपचा एक आमदार आहे. दोन जागा रिक्त आहेत.

अविश्वास ठरावादरम्यान भाजपचे आमदार ओ राजगोपाल हजर नव्हते. एलडीएफचे करात रझाक व यूडीएफचे के. एम. शाजी या दोघांना मतदानाचा अधिकार न्यायालयीन खटल्यामुळे देण्यात आला नव्हता.

अविश्वासाच्या ठरावादरम्यान विरोधकांनी सरकारवर हल्ले चढवले. केरळमधील सोने स्मगलिंग केस, लाइफ मिशन प्रोजेक्ट यामध्ये सरकारमधील मंत्री गुंतल्याचा आरोप त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0