१५ वर्षांत मध्य प्रदेशात एकही गोशाळा नाही

१५ वर्षांत मध्य प्रदेशात एकही गोशाळा नाही

भोपाळः २००३ ते २०१८ या आपल्या सरकारच्या काळात राज्यात एकही गोशाळा उभी राहू शकलेली नाही, अशी कबुली मध्य प्रदेशचे पशुपालनमंत्री प्रेमसिंह पटेल यांनी मंग

उत्तर प्रदेशात ‘मेला होबे’
सोनभद्र हत्याकांड : आदित्यनाथ सरकार कोंडीत
दोष असूनही पर्याय म्हणून मतदार काँग्रेसकडेच पाहतात

भोपाळः २००३ ते २०१८ या आपल्या सरकारच्या काळात राज्यात एकही गोशाळा उभी राहू शकलेली नाही, अशी कबुली मध्य प्रदेशचे पशुपालनमंत्री प्रेमसिंह पटेल यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार ब्रजेंद्र सिंह राठोर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटेल यांनी २००३ ते २०१८ या काळात राज्यात एकही गोशाळा उभी केली गेली नाही पण २०१८ ते २०२१ या काळात १ हजार गोशाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली व गोशाळेतल्या प्रत्येक गाईला प्रतिदिन २० रुपये मंजूर केल्याची माहिती दिली.

राज्यात सध्या १ हजार गोशाळांपैकी ९०५ गोशाळा सुरू आहेत. २०२१-२२ या नव्या आर्थिक वर्षांत २,३६५ गोशाळांना मंजुरी देण्यात आल्याचेही पटेल यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: