१४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही

१४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी देशात किती आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड आहेत या संदर्भातील विस्तृत माहिती रविवारी केंद्र सरक

कोरोना – मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख
लॉकडाउनच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे कसोटीचे!
इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी देशात किती आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड आहेत या संदर्भातील विस्तृत माहिती रविवारी केंद्र सरकारने जाहीर केली. ही माहिती २३ एप्रिल रोजी हाती आलेल्या आकड्यांवर आधारित असून देशातल्या सर्व राज्यांतील आरोग्य सचिव व कॅबिनेट सचिवांच्या दरम्यान एक बैठक झाली त्यानंतर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली.

या माहितीनुसार उ. प्रदेश, बिहार, आसाम या तीन राज्यांतील जिल्ह्यात वैद्यकीय उपकरणांची मोठी कमतरता आहे. देशातल्या १८३ जिल्ह्यांमध्ये १०० हून कमी आयसोलेशन बेड आहेत तर या १८३ जिल्ह्यांपैकी ६७ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाच्या केसेस आहेत. उ. प्रदेशातील एकूण ७५ जिल्ह्यांपैकी ५३ जिल्ह्यांत १०० हून कमी आयसोलेशन बेड असून ३१ जिल्ह्यांत कोरोनाच्या केसेस सापडल्या आहेत.

बिहारमधील ३८ जिल्ह्यांतील २० जिल्ह्यांत १०० हून कमी आयसोलेशन बेड असून त्यापैकी ९ जिल्ह्यांत कोरोना संक्रमणाच्या केसेस आढळल्या आहेत. तर आसाममध्ये ३३ जिल्ह्यांमध्ये १०० हून कमी आयसोलेशन बेड आहेत व ६ जिल्ह्यात कोरोनाचे केसेस आढळल्या आहेत.

या बैठकीत उ. प्रदेशातील सहारनपूर, फिरोजाबाद व रायबरेला या जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगण्यात आले. तसेच देशात लवकरच आयसीयू क्षमता वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्याची गरज आहे असा या बैठकीत मुद्दा मांडण्यात आला.

देशात १४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही, त्यापैकी ४७ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाची प्रकरणे आढळली असून त्यात उ. प्रदेश आघाडीवर आहे आणि या राज्यातील ३४ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही. या ३४ जिल्ह्यांपैकी १९ जिल्ह्यांत कोरोनाचे संक्रमण आढळले आहे.

मध्य प्रदेशातील ३१ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही व या राज्यात ११ जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. बिहारमधील २९ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही व येथे १० जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.

देशातील १२३ जिल्ह्यांत एकही व्हेंटिलेटर बेड नाही व त्यातील ३९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.

उ. प्रदेशातील ३५ जिल्ह्यांमध्ये २० कोरोना रुग्ण सापडले आहेत पण या जिल्ह्यांत एकही व्हेंटिलेटर बेड नाही.

बिहार व आसाममध्ये २८ व १७ जिल्ह्यांत अनुक्रमे १० व ३ जिल्ह्यांत कोरोना रुग्ण आढळले आहेत.

या बैठकीत येत्या ३ मे पर्यंत देशात अनेक ठिकाणी पायाभूत सोयींची कमतरता भासू शकेल व त्यात मुंबईमध्ये २ मेपर्यंत ऑक्सिजन पुरवणारे आयसोलेशन बेडची कमतरता भासू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशातल्या १० जिल्ह्यांनी आपली जवळपास पूर्ण क्षमता वापरली आहे. या १० जिल्ह्यात ४ उ. प्रदेशाचे तर २ गुजरातचे जिल्हे आहेत. पण अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. उ. प्रदेशातील फिरोजाबादमध्ये ३० बेड असून कोरोनाचे रुग्ण ६८ आहेत. सुरतमध्ये २५३ बेड व ४४० कोरोना रुग्ण तर मुंबईत २,२६० बेड असून कोरोनाचे रुग्ण ३,६१५ आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0