परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबईः गेले काही महिने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुरुवारी ठाणे येथील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.

कथा दहशतवाद्यांची
अज्ञात पूर्वज : आफ्रिकन डीएनए अभ्यासातून रहस्यमय शोध
महंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित

मुंबईः गेले काही महिने फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात गुरुवारी ठाणे येथील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने परमबीर सिंग यांचे वेतन रोखून धरण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर परमबीर सिंग यांना हा मोठा धक्का समजला जातो. परमबीर सिंग यांच्या विरोधातील अजामीनपात्राचे वॉरंट त्यांच्यावर असलेल्या वसुली संदर्भातील विविध गुन्ह्यांबद्दल असून परमबीर सिंग यांना अटक करून न्यायालयासमोर आणावे असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना १०० कोटीचे वसुलीचे आदेश देत असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदी असतानाच केला होता. त्यानंतर खळबळ माजली होती. धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरानजीक स्फोटके भरलेली एक गाडी ठेवल्याच्या प्रकरणानंतर देशमुख व परमबीर सिंग यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले होते. परमबीर सिंग यांना या प्रकरणात आरोपीही करण्यात आले होते. त्यातून सिंग यांनी देशमुख यांच्यावर ते पोलिसांकडून दरमहा १०० कोटी रु. वसुली घेत असल्याचा आरोप केला होता. मुंबईच्या आयुक्तपदी असताना सिंग अचानक रजेवर गेले व नंतर ते बेपत्ता झाले. सिंग यांच्याविरोधात लूक आउट नोटीसही बजावण्यात आली आहे.

सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने ते देशाबाहेर पळून गेल्याचे बोलले जात होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे सूचक वक्तव्यही केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: