उ. कोरियात ‘कोविड-१९’चा संशयित रुग्ण

उ. कोरियात ‘कोविड-१९’चा संशयित रुग्ण

सेऊलः उ. कोरिया व द. कोरियाच्या सीमेवरील केसोंग या गावात रविवारी देशातला पहिला संशयित कोविड-१९ रुग्ण आढळल्याने उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन य

कोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको
देशात ४८ तासांत १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण
कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

सेऊलः उ. कोरिया व द. कोरियाच्या सीमेवरील केसोंग या गावात रविवारी देशातला पहिला संशयित कोविड-१९ रुग्ण आढळल्याने उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी या भागात आणीबाणी जाहीर केली आहे. हा संशयित कोविड-१९ रुग्ण महिन्यापूर्वी द. कोरियातून बेकायदा उ. कोरियात आला होता. या रुग्णाची कोरोना चाचणी झाल्याबद्दल नेमकी माहिती सरकारने प्रसिद्ध केलेली नाही पण रुग्णाच्या श्वसन नलिकेच्या व रक्ताच्या चाचण्या केल्या असून खबरदारी म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती सरकारी वृत्तसंस्था ‘केसीएनए’ने दिली आहे.

दरम्यान कोविड-१९ची साथ देशात पसरू नये म्हणून किम यांनी पॉलिटब्युरोची बैठक घेऊन परिस्थितीची माहिती घेतली.

महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण जगाला कोविड-१९ साथीने वेढले असताना उ. कोरियाने मात्र आपल्या देशात या साथीचा एकही रुग्ण नसल्याचे सांगितले होते. पण आता रविवारी त्यांनी पहिला संशयित कोविड-१९ रुग्ण सापडल्याची कबुली दिली आहे. उ. कोरियाने आर्थिक मदतीचीही मागणी केली आहे.

अणुकार्यक्रम सुरू ठेवल्याने उ. कोरियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध घातले असल्याने या देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोविड-१९ची जगभर पसरलेली साथ पाहता राजधानी प्याँगयाँगमधील सरकारी रुग्णालय अद्ययावत केलेले नाही. पण रशियाने हजारो कोरोना कीट उ. कोरियाला पाठवले आहेत.

आता सापडलेला हा रुग्ण द. कोरियातून आला असल्याचा दावा करत या देशाकडून आर्थिक मदत उ. कोरिया करू शकतो, असे मत क्युंग ही विद्यापीठातील प्रा. चू जे वू यांनी व्यक्त केले आहे.

उ. कोरिया व द. कोरिया सीमेवर प्रचंड सैन्य तैनात असून तेथे अहोरात्र पहारा असतानाही हा संशयित रुग्ण द. कोरियातून उ. कोरियात आला कसा याबाबत केसीएनए या वृत्तसंस्थेने माहिती दिलेली नाही. द. कोरियाने मात्र या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

 (Reuters)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: