मृतांचा आकडा मीडियाने फुगवलाः गुजरात सरकार

मृतांचा आकडा मीडियाने फुगवलाः गुजरात सरकार

अहमदाबादः गुजरातमधील भयावह कोविड-१९ महासाथीच्या बातम्या, फोटो गेले तीन महिने प्रसार माध्यमे, सोशल मीडियातून येत आहेत. आपले आप्त मरण पावल्यामुळे स्मशान

शाळा सुरू; पहिले १५ दिवस उजळणी
अखेर वरावरा राव यांच्यावर नानावटीत उपचार
रिप्लेसमेंट सिद्धांत आणि जगभरचे जेंड्रन

अहमदाबादः गुजरातमधील भयावह कोविड-१९ महासाथीच्या बातम्या, फोटो गेले तीन महिने प्रसार माध्यमे, सोशल मीडियातून येत आहेत. आपले आप्त मरण पावल्यामुळे स्मशानामध्ये, दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या रांगा पाहून गुजरातमधील परिस्थिती किती गंभीर झाली आहे हे दिसून येते. कोविड परिस्थितीवरून गुजरात सरकारने केलेले दावे पोकळ असल्याचे दिसून येत आहेत.

कोविडमुळे प्रत्यक्ष मरण पावलेले व सरकार दफ्तरी कोविडमुळे मरण पावलेल्या रुग्णांची नोंद यातील मोठी तफावत राज्यातील दैनिक दिव्य भास्करसारख्या महत्त्वाच्या दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर तर देशाला गुजरातमध्ये काय घडत आहे, हे दिसून आले.

दैनिक दिव्य भास्करने कोविड रुग्णांचे मृत्यू सरकार कसे लपवत आहे, या संदर्भात शोधपत्रकारिता केली आणि धक्कादायक माहिती हाती लागली. दिव्य भास्करच्या वृत्तानुसार १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या ७१ दिवसांच्या कालावधीत गुजरात सरकारने १ लाख २३ हजार ८७१ व्यक्ती मृत झाल्याची नोंद केली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षी याच कालावधीत नोंद केलेल्या मृतांच्या जवळपास दुप्पट आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५८ हजार इतका होता. या आकड्यावरून लक्षात आले की या वर्षीच्या ७१ दिवसांत मृतांच्या आकडेवारीत ६७,७८१ जणांची भर आहे. मृतांच्या आकडेवारीतील ही प्रचंड वाढ कोविड-१९मुळे आहे. सरकारने १ मार्च २०२१ ते १० मे २०२१ या ७१ दिवसांच्या काळात राज्यात कोविडने मरण पावलेल्यांचा आकडा ४,२१८ इतका जाहीर केला होता.

राज्यात कोविडने मरण पावलेल्यांचा आकडा सरकार लपवत असल्याचा दावा मीडियाने अनेकवेळा करूनही राज्य सरकार व मंत्री यावर मौन बाळगून बसले होते.

या संदर्भात जेव्हा पत्रकार राज्याच्या प्रधान आरोग्य सचिव जयंती रवी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावर रवी कोणतीही माहिती देत नाहीत. त्या फक्त मोबाइल मेसेजवरून ‘प्लीज टेक्स्ट’ असेच समोरून उत्तर देतात. पण त्यांच्या कडून आजपर्यंत कोणताही अधिकृत माहिती मिळालेली नाही. राज्याचे आरोग्य आयुक्त जयप्रकाश शिवहरेही आपण मिटिंगमध्ये असून आपण नंतर बोलू असे उत्तर पत्रकारांना देतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे राज्याच्या आरोग्य खात्याचा पदभार आहे, ते कोरोनातून बरे होत आहेत पण त्यांचा फोन सतत व्यस्त असतो.

जेव्हा पत्रकारांनी राज्यातील कोविड परिस्थिती मांडली तेव्हा मात्र प्रशासन एकदम जागे झाले. सरकारने बातमीत मांडलेले आकडे अवास्तव असल्याचा दावा केला. दिव्य भास्करची बातमी प्रसिद्ध झाली त्यानंतर २४ तासाच्या आत राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा यांनी दिव्य भास्करची आकडेवारी फेटाळून लावली. वास्तविक जाडेजा यांच्याकडे आरोग्य खाते नाही. पण ते सरकारच्या बचावासाठी धावले. कोविड मृतांचा आकडा कमी आहे. अनेक रुग्ण वेगाने बरे होत आहे. बातमीत खोडसाळपणा आहे, असे आरोप त्यांनी केले.

राज्यातले कोविडचे रुग्ण कमी होत आहे, कोविडचा फैलाव कमी होत आहे. मृतांचा आकडाही कमी असताना प्रसार माध्यमे समाजात भीती पसरवणारी बातमी देत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

जाडेजा एवढ्यावर थांबले नाही त्यांनी दिलेले स्पष्टीकरण असे..

“एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कुटुंबियांना बँक विमा, एलआयसी व अन्य कारणासाठी मृताचा दाखला हवा असतो. आम्ही हा दाखला लगेच मिळावा म्हणून ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे कुटुंबियांना हा दाखला घरबसल्या मिळू शकतो. मृतदाखले अनेक कारणांसाठी दिले जातात, एखाद्या मृत व्यक्तीची एकापेक्षा अधिक वेळा नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृताचा दाखल्याची संख्या व प्रत्यक्ष मृत नोंदणी यात फरक असू शकतो. मरण ही गंभीर घटना असल्याने त्यानंतर अनेक धार्मिक विधी केले जात असतात. त्यामुळे अनेकदा मृतांची नोंदही केली गेली नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. मृत झाल्याची वेळ, नोंदणी व मृताचा दाखला या तीन वेगवेगळ्या बाबी आहेत. या तिन्ही बाबी एकत्र दाखवून मृतांचा आकडा व त्यामागची कारणे देणे हे प्रसार माध्यमांनी टाळावे.”

गुजरातमधील ही भयावह परिस्थिती सांगताना इंडियन मेडिकल असो.चे गुजरात विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रेश जरदोश म्हणाले, आकडेवारीतील तफावत सरकारला मान्यच करायची नाहीये. ज्यांना आजार आहेत व जे कोरोनाने मरण पावले आहेत ते मृत्यू कोरोनामुळेच आहेत हे सरकार मान्य करत नाही. आयसीएमआरने कोविड रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहेत. ती सरकारकडून पाळली जात नाहीत.

डॉ. जरदोश जे सांगत आहेत ते एका परिने खरे आहे कारण खुद्ध गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पूर्वीच आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाल्यास तो मृत्यू कोरोनामुळे झाला असे मानता येत नाही, असे स्पष्ट केले होते.

एकूणात सरकारच्या अशा स्पष्टीकरणानंतर दिव्य भास्करचे स्टेट एडिटर देवेंद्र भटनागर यांनी हिंदीमध्ये एक ट्विट करून आपली बातमीदारी पुरावे, आकडेवारीवर आधारित असल्याचा दावा केला आहे. आमची बातमी खोटी आहे हे सरकारने आकडेवारी व पुरावे देऊन सिद्ध करावे असे आव्हानही त्यांनी गुजरात सरकारला दिले आहे. वर्तमानपत्रात श्रद्धांजलीच्या येणार्या जाहिराती, रुग्णालयात आणले जात असलेले मृतदेह यावरून वस्तुस्थिती कळेल असेही ते म्हणाले. सरकारने आजार नसलेले पण कोरोनाने झालेले मृत्यू व आजार असलेल्यांचा कोरोनाने झालेला मृत्यू याची आकडेवारी जाहीर करावी असेही आव्हान भटनागर यांनी दिली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने सरकारकडे हीच मागणी केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दर्शन देसाई हे गुजरातमधील डेव्हलमेंट न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0