संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी होणार – अमित शहा

संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी होणार – अमित शहा

नवी दिल्ली : संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) केली जाईल, अशी घोषणा बुधवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ही नोंदण

सीएए नियमावलीसाठी मुदतवाढ द्याः केंद्राची विनंती
दिल्ली हिंसाचाराबद्दल इतकं दीर्घ मौन का?
‘लष्कर ए तय्यबा’चा कमांडरचा भाजपचा सोशल मीडिया प्रभारी

नवी दिल्ली : संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) केली जाईल, अशी घोषणा बुधवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ही नोंदणी धर्माच्या आधारावर केली जाणार नाही. या नोंदणीत हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्माच्या लोकांना स्थान नाही अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कोणी घाबरून जाण्याचे कारण नाही. प्रत्येक धर्माला यादीत स्थान दिले जाईल पण या नोंदणीच्या आधारे राष्ट्रीयत्व निश्चित केले जाईल असे शहा यांनी स्पष्ट केले. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीत ज्यांची नावे नसतील त्यांना ट्रायब्युनलमध्ये पुन्हा अर्ज दाखल करण्याची संधी जाईल, त्याचबरोबर ज्यांच्याकडे वकील नसतील त्यांना आसाम सरकारकडून वकील दिले जातील, असेही शहा यांनी सांगितले.

आसाममध्ये झालेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीतून १९ लाख लोकांची नावे समाविष्ट झालेली नव्हती, त्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता.

काश्मीरात तीन महिन्यात ५,११६ जणांना अटक; लवकरच  इंटरनेट सुरू

५ ऑगस्ट रोजी ३७० कलम रद्द झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात सरकारने ५,११६ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती गृहखात्याने राज्यसभेत दिली. गेल्या तीन महिन्यात दीडशेहून अधिक दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. पण पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाही व्यक्तीचा बळी गेला नसल्याचे शहा यांनी सांगितले. काश्मीरमध्ये लवकरच इंटरनेट सेवा सुरू केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये परिस्थिती ठीक असून तेथे रोज वर्तमानपत्रे प्रकाशित होत आहेत. टीव्ही चॅनेल व्यवस्थित चालू आहेत. वर्तमानपत्रांच्या खपात काहीही फरक पडलेला नाही असाही दावा शहा यांनी केला. गेल्या वर्षी खोऱ्यात ८०२ दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. या वर्षी हा आकडा ५४४ इतका खाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: