ऑलिम्पिक हॉकीपटू वंदनाच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ

ऑलिम्पिक हॉकीपटू वंदनाच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ

नवी दिल्लीः भारतीय महिला हॉकी संघाला हॅटट्रीकच्या माध्यमातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देणारी खेळाडू वंदना कटारिया हिच्या कुटुंबाला अर्जेंटिनासोबतचा

भाजप नेता कुलदीप सेंगर बलात्कार प्रकरणात दोषी
घुसखोरी नाही, शत्रूला धडा शिकवला – मोदी
ग्रॅज्युइटीचा कालावधी १ वर्षावर आणण्याचा प्रस्ताव

नवी दिल्लीः भारतीय महिला हॉकी संघाला हॅटट्रीकच्या माध्यमातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देणारी खेळाडू वंदना कटारिया हिच्या कुटुंबाला अर्जेंटिनासोबतचा सामना भारताने हरल्यामुळे म्हणून जातीवाचक शिव्यांना सामोरे जावे लागले.

वंदना कटारियाचे कुटुंब उत्तराखंडमधील हरिद्वार येथील रोशनाबाद येथे राहात आहे. ४ ऑगस्टला भारताचा अर्जेंटिनाविरुद्ध सामना होता. या सामन्यात भारताला २-१ ने पराभव पत्करावा लागल्यानंतर गावातले दोन उच्चवर्णीय व्यक्ती कटारियाच्या घरात आल्या व त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. या व्यक्तींनी तिच्या घरासमोर फटाकेही फोडले. जेव्हा कटारियाच्या घरातील सदस्य बाहेर आले तेव्हा या दोन व्यक्ती नाचत होत्या व जातीवाचक शिव्या देत होत्या, असे कटारियाचा भाऊ शेख्रर याने सांगितले. या संदर्भात शेखरने पोलिसांत तक्रार नोंद केली आहे.

केवळ हॉकीच नव्हे तर भारतातल्या सर्व खेळातून दलितांना प्रवेश देता कामा नये असे या दोन व्यक्ती आम्हाला उद्देशून बोलत असल्याचे शेखरचे म्हणणे आहे. या दोघांनी आपल्या अंगातले कपडे काढले व नाचायला सुरूवात केली असेही त्याने सांगितले.

दरम्यान सिदकुल पोलिस ठाण्यात या दोन व्यक्तींविरोधात तक्रार नोंदली गेली असली तरी त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली नसल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे. या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची नावे मात्र उघड केलेली नाहीत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: