काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त; संचारबंदी लागू

काश्मीरमध्ये कडक बंदोबस्त; संचारबंदी लागू

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा दिलेले ३७० कलम संसदेने रद्द करण्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असून खबरदारी म्हणून संपूर्ण काश्मीर खोर्यात

तत्त्वज्ञानाचा नकाशा कसा वापरावा?
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
इराण हिजाब सक्तीविरोधः पोलिसांच्या गोळीबारात तरुणी ठार

श्रीनगरः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा दिलेले ३७० कलम संसदेने रद्द करण्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असून खबरदारी म्हणून संपूर्ण काश्मीर खोर्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आजच्या दिवशी खोर्यातील पाकपुरस्कृत व अन्य दहशतवादी संघटनाकडून काळा दिवस पाळण्याची व हिंसाचार वा दहशतवादी कारवाया होण्याची भीती बघता ही पावले प्रशासनाने उचलली आहेत. संपूर्ण खोर्यात पोलिस व निमलष्करी दलाच्या जवानांची संख्याही वाढवली आहे.

खोर्यातील संवेदनशील भागात सशस्त्र दले तैनात करण्यात आली आहेत. या भागात दहशतवाद्यांचे हल्ले होण्याची शक्यता असल्याने सोमवारीच खोर्यात कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सुरक्षा दलांच्या कोर कमिटीने घेतला आहे. या कमिटीची सोमवारी बैठक झाली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय लष्कराच्या १५ कोरचे जीओसी लेफ्टनंट जनरल बीएस राजू होते. त्यांनी खोर्यातील सर्व सुरक्षा परिस्थिती पाहून संचारबंदीचा प्रस्ताव ठेवला. त्यावर श्रीनगर जिल्हाधिकारी इक्बाल चौधरी यांनी ४ व ५ ऑगस्ट अशी दोन दिवस संचारबंदी राहील असे आदेश दिले.

पण या संचारबंदीमध्ये वैद्यकीय सेवा, वैध पास घेऊन जाणारे कोविड-१९वरील आरोग्य सेवक यांना सूट देण्यात आली आहे. पण नागरिकांनी संचारबंदीचे उल्लंघन करू नये म्हणून जागोजागी वाहनांमधून संचारबंदी लागू करण्याची माहिती देण्यात येत आहे. कोणीही या दोन दिवसांत घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे.

श्रीनगरसहित खोर्यातील अन्य शहरांमध्ये रस्त्यांवर अडथळे उभे केले आहे. फक्त जीवनावश्यक सेवांची वाहतूक सुरळीत होईल याची काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: