नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी

नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक

आसाम घोटाळा: आरोग्यमंत्र्यांशी संबंधित कंपन्यांचे उखळ पांढरे
आठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न १३७३.७८ कोटी, भाजपचा वाटा ५५ टक्के
राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी किती सोपी?

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांना विशेष न्यायालयात हजर केले होते. ईडीकडून नवाब मलिक यांच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी कऱण्यात आली होती. न्यायालयात दोन तासांपेक्षा जास्त वेळ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आठ दिवसांची कोठडी मंजूर केली.

मालिक यांना कोठड सुनावण्यात आल्यानंतर गाडीतून ईडी कार्यालयाकडे जाताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. त्यांना कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्यावतीने “कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा !!”, असे ट्विट करण्यात आले.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर बोलून आपला पाठिंबा व्यक्त केला.

नवाब मलिक यांना अंमलबावणी संचालनालयाने (ईडी)ने दुपारी अटक केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले नेण्यात आले नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

जुन्या मालमत्ता प्रकरणामध्ये नवाब मलिक यांची आज सकाळपासूनच ईडीतर्फे चौकशी सुरू होती. ईडीचे पथक पहाटेच त्यांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयामध्ये नेण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांची कार्यालयामध्ये चौकशी सुरू करण्यात आली होती. आठ तासांच्या चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली.

चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले तेंव्हाही मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यांनी हात उंचावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. ‘लढेंगे जितेंगे’ अशी प्रतिक्रिया मालिक यांनी दिली.

आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळीच ट्विट करून आपण झुकणार नाही, असे संकेत दिले होते. त्यामुळेच नवाब मलिक यांनी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर आपण पुढच्या लढाईसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. यानंतर नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला.

मालिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासही पक्षाचे काही अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.

“मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत. ते तातडीने हा निर्णय घेतील. अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावेळीही हेच झाले”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेनड फडणवीस म्हणाले, की हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. ९ ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे. – मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. ज्यांची मालकी त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही. जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा या प्रकरणात बयाण दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील ५५ लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे. देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय? फडणवीस म्हणाले, “माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर राजकारणाचा स्तर खालावेल. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते इतका अतिरेक करतील हे जरा आश्चर्यकारक होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी टोकाची भूमिका याआधी कुणी घेतली नव्हती. भाजपातले काही लोक सातत्याने ट्वीट करत होते की १५ दिवसांनी अटक होईल, छापे पडतील. ते खरं झालंय. कारण ईडी आणि भाजपा एकच आहे असा अर्थ आता काढावा लागेल”.

“नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत,” असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

”देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू”, असा इशारा नवाब मलिक यांनी पूर्वी दिला होता.

नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ विरोधी संचालनालयाचे संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप केले होते. तेंव्हापासून मलिक हे केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0