‘नोमडलँड’ला ऑस्कर

‘नोमडलँड’ला ऑस्कर

९३ व्या अॅकॅडमी पुरस्कार (ऑस्कर) सोहळ्यात ‘नोमडलँड’ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंट हिला सर्वोत्

पोस्टरचा विषय कोर्टाच्या कक्षेत नाही : उ. प्रदेश सरकार
बोरगडः राज्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र
रजनीकांत यांचा करिष्मा राजकारणात चालेल का?

९३ व्या अॅकॅडमी पुरस्कार (ऑस्कर) सोहळ्यात ‘नोमडलँड’ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला, तर क्लोई चाव यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाला.

क्लोई चाव

क्लोई चाव

अँथनी हॉपकिन्स

अँथनी हॉपकिन्स

फ्रान्सेस मॅकडॉर्मंट

फ्रान्सेस मॅकडॉर्मंट

भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे झालेल्या २०२१ सालच्या ऑस्कर पुरस्कार सोहोळयात ‘नोमडलँड’ चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले. ऑस्करच्या इतिहासात दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळालेल्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक ठरल्या आहेत. या आधी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातही ‘नोमडलँड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. गोल्डन ग्लोब, डिजीए या पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला विविध पुरस्कार मिळाले आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर येथे झालेला हा ऑस्कर पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने दाखविण्यात आला. या सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’,  ‘द फादर’, ‘नोमेडलँड’,

‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना पुरस्कार मिळाले.

अभिनेते अँथनी हॉपकिन्स यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर अभिनेत्री योहून यु जंग यांना ‘मिनारी’ या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अभिनेता डॅनियेल कालूया यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

ऑस्करचे चित्रपट
ऑस्कर पुरस्कारांसाठी ज्या चित्रपटांना नॉमिनेशन्स मिळाली आहेत, अशा चित्रपटांवर ‘द वायर मराठी’वर लेखमाला सुरू होती. हे सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन – https://marathi.thewire.in/the-trial-of-the-chicago-7
बोचरा थट्टापट : बोराट – https://marathi.thewire.in/borat-academy-award-nominations
साऊंड ऑफ मेटल – https://marathi.thewire.in/sound-of-metal-nominations…
आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ ‘मिनारी’ – https://marathi.thewire.in/minari-nominations-academy…
जूडस अँड ब्लॅक मेसिया – https://marathi.thewire.in/judas-and-the-black-messiah…

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: