कोविड-१९महासाथीत १० हजार कंपन्या बंद

कोविड-१९महासाथीत १० हजार कंपन्या बंद

नवी दिल्लीः एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान देशभरातले १० हजाराहून अधिक कंपन्या बंद पाडल्या. या कंपन्या बंद पडण्यामागचे महत्त्वाचे कारण कोविड

रविवारी ‘जनता कर्फ्यु’ – मोदींचे आवाहन
कोरोना संकटात मोदी सरकार किती गंभीर?
कोरोना – मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख

नवी दिल्लीः एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दरम्यान देशभरातले १० हजाराहून अधिक कंपन्या बंद पाडल्या. या कंपन्या बंद पडण्यामागचे महत्त्वाचे कारण कोविड-१९ महासाथीमुळे पुकारण्यात आलेले लॉकडाऊन होते असे स्पष्टीकरण सरकारने सोमवारी लोकसभेत दिले.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार बंद झालेल्या कंपन्यांची संख्या १०,११३ इतकी असून या कंपन्या स्वैच्छिक रित्या बंद पडल्या असल्याने त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करता येत नाही, असे सरकारने सांगितले.

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीत २,३९४ कंपन्या, उ. प्रदेशात १,९३६, तामिळनाडूत १,३२२, महाराष्ट्रात १,२७९. कर्नाटकात ८३६, चंडीगडमध्ये ५०१, राजस्थानमध्ये ४७९, तेलंगणमध्ये ४०४, केरळमध्ये ३०७, झारखंडमध्ये १३७, म. प्रदेशात १११, बिहारमध्ये १०४, मेघालय ८८, ओडिशा ७८, छत्तीसगड ४७, गोवा ३६, पुड्डूचेरी ३१, गुजरातमध्ये १७, प. बंगालमध्ये ४ व अंदमान- निकोबारमध्ये २ कंपन्या बंद पडल्या.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: