४९ ‘देशद्रोही’ मान्यवरांच्या बाजूने उतरले १८५ कलावंत

४९ ‘देशद्रोही’ मान्यवरांच्या बाजूने उतरले १८५ कलावंत

नवी दिल्ली : झुंडबळीच्या विरोधातच बोलणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर या मान्यवरांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशात

हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश
६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन!
कॅप्टन अमरिंदर सिंगांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : झुंडबळीच्या विरोधातच बोलणाऱ्या देशातील ४९ मान्यवरांवर देशद्रोहाचा खटला दाखल केल्यानंतर या मान्यवरांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी देशातील सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रातील आणखी १८५ कलावंत मैदानात उतरले आहे. या कलावंतांनी देशात वाढते झुंडबळी रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घालणाऱ्या ४९ मान्यवरांच्या पत्राचे समर्थन केले असून लोकांचा आवाज दाबण्याचा व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांचा छळ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आमचा कडाडून विरोध असेल असे या मान्यवरांनी स्पष्ट केले आहे.

झुंडबळी रोखण्यासाठी ज्या कलावंतांनी मोदींना पत्र पाठवले ते समाजातील प्रतिष्ठित नागरिक असून त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले आहे. या कलावंतांनी झुंडबळीच्या विरोधात जर भीती, चिंता प्रकट केली असेल तर त्याला देशद्रोह म्हणायचे का? या मान्यवरांचा आक्रोश बंद करण्यासाठी न्यायालयांच्या मार्फत त्यांना त्रास देणे हा छळ नाही का असा सवाल १८५ मान्यवरांनी केला आहे. जर सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा, त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर आम्हीही सातत्याने आवाज उठवत जाऊ असाही इशारा या मंडळींनी दिला आहे.

या १८५ मान्यवरांच्या यादीत प्रामुख्याने अभिनेता नसीरुद्धीन शाह, लेखिका नयनतारा सहगल, नृत्यांगना मल्लिका साराभाई, इतिहास संशोधक रोमिला थापर, विचारवंत आनंद तेलतुंबडे, शास्त्रीय गायक टी. एम. कृष्णा, कलाकार विवान सुंदरम आदी सामील आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: