‘संविधान’ हा २०१९मधील हिंदीतील सर्वाधिक लक्षवेधी शब्द

‘संविधान’ हा २०१९मधील हिंदीतील सर्वाधिक लक्षवेधी शब्द

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने मंगळवारी ‘संविधान’ हा २०१९सालमधील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा हिंदी शब्द म्हणून घोषित केला आहे. हा शब्द त्य

भारतीय राज्यघटना आणि चित्रपट
मोदी नाही तर मग कोण?
काश्मीर आणि ३७०: दीर्घकाळ परिणाम करणारे सनदशीर कारस्थान

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने मंगळवारी ‘संविधान’ हा २०१९सालमधील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा हिंदी शब्द म्हणून घोषित केला आहे. हा शब्द त्यांनी आपल्या नव्या शब्दकोशात समाविष्ट केला आहे. गेले वर्षभर या शब्दाने जगाचे लक्ष वेधून घेतले असून भारतात लोकशाही, धर्मनिरपेक्षतता, न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची कसोटी लागली असल्याने हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ऑक्सफर्डने दिले आहे.

जगभरातून दरवर्षी अशा शब्दाचा ऑक्सफर्ड शोध घेते की, ज्यातून एखाद्या देशाची, समाजाची अभिव्यक्ती प्रतीत होते व लोक या शब्दाचा मोठ्या प्रमाणात आपल्या दैनंदिन जीवनात वापर करताना दिसतात, त्यावर चर्चा होते. अशा शब्दांतून त्या संस्कृतीची एक ओळखही जगाला होत असते.

भारतात गेले वर्षभर ‘संविधान’ हा शब्द ३७० कलम, ३५ अ कलम, रामजन्मभूमी निकाल, शबरीमला, महाराष्ट्रातील सत्तापेच, कर्नाटकातील १७ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसी, एनपीआर अशा विविध मुद्द्यांनी चर्चिला गेला होता. त्यामुळे त्याची दखल ऑक्सफर्ड शब्दकोशाने घेतली आहे.

ऑक्सफर्डने ‘संविधान’ व्यतिरिक्त आँटी, बस स्टँड, डीम्ड युनिव्हर्सिटी, एफआयआर, नॉन वेज, रिड्रेसल, टेम्पो, ट्यूब लाइट, व्हेज, व्हिडिओग्राफी, करंट (वीज), लुटेरा, लूटपाट व उपजिला हे हिंदी शब्द आपल्या शब्दकोशात समाविष्ट केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0