भूतकाळ गाडून पुढे जायला हवेः जनरल बाजवा

भूतकाळ गाडून पुढे जायला हवेः जनरल बाजवा

नवी दिल्लीः भारत-पाकिस्तानने आपला भूतकाळ गाडून नव्याने आपले संबंध प्रस्थापित करायला हवेत, असे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी केल

३७० कलमाचे पडसाद द. आशियाच्या राजकारणावर
गुंतागुंतीचा बलुचिस्तान
३७० कलम : दक्षिण आशियातील बदलती समीकरणे

नवी दिल्लीः भारत-पाकिस्तानने आपला भूतकाळ गाडून नव्याने आपले संबंध प्रस्थापित करायला हवेत, असे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी केले आहे. भारत-पाकिस्तान मैत्री संबंध असावेत असे त्यांनी या पूर्वीही विधान केले होते. पण गुरुवारी विधान करताना बाजवा यांनी भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत होण्याकरिता भारताने योग्य, सौहार्दाचे वातावरण तयार करावे, काश्मीरसंदर्भात पावले उचलायला हवीत असेही म्हटले आहे.

गेल्या ३ फेब्रुवारीला बाजवा यांनी पाकिस्तान एअर फोर्स अकादमीच्या एका कार्यक्रमात भारत-पाकिस्तानने मैत्रीचे हात पुढे करायला हवेत, असे विधान केले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवर युद्धबंदी असावी यासाठीचे संयुक्त निवेदनपत्र भारत-पाकिस्तानच्या लष्कराने जारी केले होते.

गुरुवारच्या आपल्या भाषणात बाजवा यांनी दक्षिण व मध्य आशियातील संपर्क वाढवण्यासाठी भारत-पाकिस्तानमधील संबंध स्थिर असायला हवेत अशी भूमिका मांडली. उभय देशातील संबंध स्थिर झाल्यास पूर्व व पश्चिम आशिया जोडला जाऊ शकतो पण हा सामर्थ्य लक्षात न घेता उभय देशांमधील दुरावा व तणाव नुकसानदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजवा यांनी भारत-पाकिस्तान संबंधांत काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गाने तोडगा निघणे गरजेचे आहे पण त्यासाठी भारताने पावले उचलणे गरजेचे आहे. विशेषतः भारतव्याप्त काश्मीरमध्ये भारताने सौहार्दाचे वातावरण उभे करणे महत्त्वाचे आहे, असे बाजवा म्हणाले.

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही एका कार्यक्रमात दोन्ही देशांना लाभलेल्या भौगोलिक-सामरिक प्रदेशाचा विकासासाठी सर्वांर्थाने वापर करायचा असेल उभय देशांमध्ये शांतता व सौहार्द प्रस्थापित होण्याची गरज असून तसे झाल्यास व्यापारवृद्धीला चालना मिळाले अन्यथा होणार नाही, असे मत व्यक्त केले होते. इम्रान खान यांनी ५ ऑगस्ट २०१९ या तारखेचा उल्लेख करत (३७० कलम रद्द झाले) त्या दिवसापासून भारत-पाकिस्तानमधील संबंध पूर्ण बिघडल्याचे सांगितले. या एकूण काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने एकही पाऊल पुढे टाकलेले नाही त्यामुळे आम्हाला टाकता येत नाही, असेही ते म्हणाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: