राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

राज, दिलीप कुमार यांच्या वास्तू पाक सरकार खरेदी करणार

पेशावरः हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन महान कलावंत दिलीप कुमार व राज कपूर यांच्या पेशावर शहरातील दोन वास्तू विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तानातील खैबर-पख्तुन

गॉसिपिंगच्या अलीकडे.. पलीकडे…
दिलीप कुमारः अभिनयाचे व्याकरण….
शैलीदार आद्यनायक

पेशावरः हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन महान कलावंत दिलीप कुमार व राज कपूर यांच्या पेशावर शहरातील दोन वास्तू विकत घेण्याचा निर्णय पाकिस्तानातील खैबर-पख्तुनख्वा या प्रांतीय सरकारने घेतला आहे. या वास्तू विकत घेण्यासाठी विशेष आर्थिक निधीही गोळा केला जाणार आहे.

राज कपूर व दिलीप कुमार या दोन कलावंतांचे जन्म पेशावर येथे झाले होते, तसेच त्यांचा बालपणाचा काळ या शहरांत व्यतीत झाला होता. पण भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर हे दोघेही आपल्या काही कुटुंबीयांना घेऊन भारतात आले होते.

या दोन्ही कलावंतांची वास्तू पेशावर शहराच्या मध्यभागी असल्याने ती काही वर्षांपर्यत आकर्षणाचे केंद्रबिंदू होती. या वास्तू पूर्वीच राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. पण सध्या या वास्तूंची स्थिती खराब असल्याने ती जमीनदोस्त करण्याचे व ती जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न काही बिल्डरांकडून सुरू होते. बिल्डर लॉबीला येथे कर्मिशियल प्लाझा करायचा होता. पण बिल्डर लॉबीचे हे प्रयत्न पाहून खैबर-पख्तुनख्वामधील पुरातत्व विभागाने या दोन वास्तू विकत घेण्याचा निर्णय घेतला. या वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्यांचे जतन करणे गरजेचे असल्याचे पुरातत्व खात्याचे म्हणणे आहे.

इतिहास

राज कपूर यांच्या पेशावरस्थित घराचे नाव ‘कपूर हवेली’ असे असून ती ‘किस्सा ख्वानी बाजार’ येथे आहे. १९१८ ते १९२२ या दरम्यान ही हवेली राज कपूर यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी बांधली  होती. या वास्तूत राज कपूर व त्यांचे काका त्रिलोक कपूर यांचा जन्म झाला होता. ही हवेली पूर्वीच राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्यात आली होती.

पण ‘कपूर हवेली’चे मालक अली कादर यांना ही वास्तू पाडायची इच्छा नाही, ही वास्तू राष्ट्रीय वारसा व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे. पण ही वास्तू सरकारला देण्याच्या बदल्यात त्यांनी २०० कोटी रु. मागितले आहेत.

२०१८मध्ये राज कपूर यांचे दिवंगत पुत्र ऋषी कपूर यांनी ‘कपूर हवेली’चे रुपांतर संग्रहालयात करावे अशी विनंती पाकिस्तान सरकारला केली होती. ही विनंती सरकारने मान्य केली होती. पण गेली दोन वर्ष त्या संदर्भात फारसे काही घडले नाही.

दिलीप कुमार यांचे याच भागात सुमारे १०० वर्ष जुने घर आहे. हे घर अत्यंत जीर्ण झाले असून २०१४मध्ये नवाझ शरीफ सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा यादीत सामील केले होते.

पेशावरमध्ये ३०० वर्षांहून अधिक जुन्या सुमारे १,८०० वास्तू आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: