प्रकाश बादलांकडून पद्म विभूषण परत

प्रकाश बादलांकडून पद्म विभूषण परत

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायदेविरोधात चिघळलेल्या आंदोलनात गुरुवारी आणखी एका घटनेची भर पडली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री व शिरोमणी

झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या
लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी
मोदींच्या सुरक्षा यंत्रणेत त्रुटी; सुप्रीम कोर्ट चौकशी करणार

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायदेविरोधात चिघळलेल्या आंदोलनात गुरुवारी आणखी एका घटनेची भर पडली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख नेते प्रकाश सिंह बादल यांनी शेती कायद्याच्या विरोधात आपला पद्म विभूषण पुरस्कार राष्ट्रपतींना परत केला.

पद्म विभूषण पुरस्कार हा भारत रत्ननंतरचा देशातला दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जातो. २०१५मध्ये मोदी सरकारने बादल यांना त्यांच्या राजकीय जीवनातील उल्लेखनीय प्रवासाबद्दल पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

बादल यांचा अकाली दल पूर्वीच या मुद्द्यावरून एनडीएतून बाहेर पडला आहे तसेच या पक्षाने आपले वाट्याचे केंद्रीय मंत्रिपदही सोडले आहे.

आपल्या पुरस्कार वापसीचे कारण स्पष्ट करताना बादल यांनी आयुष्यात आपण आज जे काही आहोत ते जनतेमुळे आहोत. त्यात सर्वसामान्य शेतकर्यांमुळे. आज शेतकर्यांचा आत्मसन्मान सरकारने ठेचला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत पद्म विभूषण पुरस्कार ठेवण्यात काहीच औचित्य राहात नाही. शेतकरी आपल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी थंडीत कुडकुडत संघर्ष करत आहे, असे ते म्हणाले.

बादल यांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात भारत सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात केल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यांचे हे आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही अंगाने सुरू असल्याचा दावा केला. या आंदोलनाला सरकारकडून मिळणारा प्रतिसाद उदासीन व अवमानना करणारा असल्याने आपण पुरस्कार परत करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अकाली दलानेही आपली अधिकृत प्रतिक्रिया देताना मोदी सरकारने शेती कायदे करून शेतकर्यांशी दगाबाजी केली, निर्दयपणे वागले त्यामुळे बादल यांनी आपला पद्म विभूषण पुरस्कार परत केल्याचे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: