टेक फ़ॉग : संसदीय समितीने गृहखात्याकडून स्पष्टीकरण मागवले

टेक फ़ॉग : संसदीय समितीने गृहखात्याकडून स्पष्टीकरण मागवले

नवी दिल्लीः टेक फ़ॉग अॅपच्या संदर्भात माहिती द्यावी असे पत्र गृह खात्याच्या संदर्भातल्या संसदीय समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी केंद्रीय गृह सचिवांना पाठवले आहे. द हिंदूने हे वृत्त दिले असून या पत्रात गृह खात्याने अन्य खात्यांकडून टेक फॉग अॅप संदर्भात माहिती मागवावी व ती संसदीय समितीला २० जानेवारीपर्यंत सादर करावी असे आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

या पूर्वी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन व काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही टेक फॉग अॅप संदर्भातील माहिती मागवून घ्यावी असे पत्र आनंद शर्मा यांना पाठवे होते. डेरेक ओ ब्रायन यांनी द वायरमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला दिला आहे. ओ ब्रायन स्वतः समितीचे सदस्यही आहेत.

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानेही टेक फॉग अॅप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालावे अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे.

टेक फॉग अॅप काय आहे?

टेक फॉग अॅपमध्ये माहिती चोरणे व तिचा गैरवापर करण्याची क्षमता आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी तसेच मोदी सरकारच्या टीकाकारांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  टेक फॉग या छुप्या अॅपबद्दल २० महिने केलेल्या अन्वेषणाचा पहिला भाग गेल्या आठवड्यात ‘द वायर’ने प्रसिद्ध केला होता.

टेक फॉगला अनन्यसाधारण आणि घातक स्वरूप देणारी चार फीचर्स आम्ही स्पष्ट करून दाखवली होती- (१) ट्विटर व फेसबुकवरील ट्रेण्ड्स ताब्यात घेणे, (२) निष्क्रिय व्हॉट्सअॅप अकाउंट्सचा ताबा घेणे, (३) लक्ष्यिकृत नागरिकांचा छळ करण्यासाठी अत्यंत विशिष्ट डेटाबेस तयार करणे व उपयोगात आणणे आणि (४) या अॅपचा वापर करण्यासाठी झालेली राजकीय-कॉर्पोरेट संभाव्य हातमिळवणी. आम्ही वृत्तांत प्रसिद्ध केल्यानंतर यामधील स्रोताने ज्यांचे नाव घेतले होते, त्या पर्सिस्टण्ट सिस्टम्स आणि शेअरचॅट या दोन कंपन्यांनी, या अॅपबद्दल काहीही माहिती नाही, असे सांगणारी निवेदने प्रसिद्ध केली आहेत.

मूळ वृत्त

COMMENTS