जेएनयूवरचा चित्रपट केरळ सेन्सॉर बोर्डाने रोखला

जेएनयूवरचा चित्रपट केरळ सेन्सॉर बोर्डाने रोखला

तिरुवनंतपुरमः जेएनयू विद्यापीठातल्या विद्यार्थी आंदोलनाचा विषय असलेल्या ‘वर्तमानम’ या मल्याळी चित्रपटाला केरळस्थित सीबीएफसी (सेन्सॉर बोर्ड) क्षेत्रीय

लॉकडाऊनमध्ये श्रमिकांना पगार देण्याचा आदेश गृहखात्याकडून मागे
रिप्लेसमेंट सिद्धांत आणि जगभरचे जेंड्रन
एम.जे.अकबरांच्या नियुक्तीला पत्रकारांचा विरोध

तिरुवनंतपुरमः जेएनयू विद्यापीठातल्या विद्यार्थी आंदोलनाचा विषय असलेल्या ‘वर्तमानम’ या मल्याळी चित्रपटाला केरळस्थित सीबीएफसी (सेन्सॉर बोर्ड) क्षेत्रीय कार्यालयाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

या चित्रपटाचा विषय केरळमधील एका महिलेवर केंद्रीत असून ती स्वातंत्र्य आंदोलनासंदर्भात एका संशोधनासाठी केरळमधून दिल्लीतल्या  जेएनयूमध्ये जाते आणि तेथील परिस्थिती टिपते, असा आहे.

या चित्रपटाला प्रमाणपत्र का नाकारले याचे कारण सीबीएफसीने दिलेले नाही. पण चित्रपटाचे निर्माता, पटकथा-लेखक-दिग्दर्शक आर्यदान शौकत यांनी मुंबईत सेन्सॉर बोर्डकडे आपला चित्रपट प्रमाणपत्रासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्यदान शौकत हे काँग्रेसचे नेते आहेत. पण ते केरळमधील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शकही आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही पूर्वी मिळालेला आहे. आपल्या चित्रपटाची कथा लिहिण्याअगोदर शौकत यांनी जेएनयूचा परिसर, त्याचा इतिहास, संस्कृती व तेथील जीवनशैली यांचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत काही काळ वास्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या वर्तमानम चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली होती.

या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्यामागे राजकारण असल्याचा आरोप करत शौकत यांनी सेन्सॉर बोर्डवर असलेले भाजपच्या एससी गटाचे एक नेते व वकील वी. संदीप कुमार यांच्या एका ट्विटचा उल्लेख केला आहे. या ट्विटमध्ये संदीप कुमार यांनी वर्तमानम या चित्रपटाला प्रमाणपत्र न देण्यामागील कारण शौकत हे या चित्रपटाचे लेखक व निर्माते असून त्यांच्या चित्रपटाचा विषय देशविरोधी आहे. सेन्सॉर बोर्डचा सदस्य असल्याने मी हा चित्रपट पाहिला पण या चित्रपटात जेएनयूमधील विद्यार्थी दलित व मुसलमानांवर होणार्या (कथित) अत्याचाराच्या विरोधात आंदोलन करतात, असा विषय होता, त्याला माझा विरोध होता, असे म्हटले होते.

पण या ट्विटवर वाद झाल्याने नंतर संदीप कुमार यांनी हे ट्विट हटवले.

दरम्यान, संदीप कुमार यांना हा चित्रपट प्रसिद्ध होऊ नये असे वाटत असल्याने ते प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात होते, असा आरोप शौकत यांनी केला आहे. सेन्सॉर बोर्डावर बसलेल्या सदस्यांना चित्रपटाचे ज्ञान नसते, त्यांना आपला राजकीय अजेंडा चालवायचा असतो असा आरोप शौकत यांनी केला आहे. माझा चित्रपट एखाद्या विद्यापीठातील लोकशाही आंदोलनाचा विषयावर असेल तर तो राष्ट्रविरोधी कसा ठरू शकतो असा सवालही शौकत यांनी केला आहे.

वर्तमानमला सेन्स़ॉर बोर्डातील अन्य दोन सदस्यांचा पाठिंबा होता. गेल्या मार्चमध्ये या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध अभिनेते मामूटी यांनी प्रसिद्ध केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0