आघाडी सरकारसाठी हालचाली सुरु

आघाडी सरकारसाठी हालचाली सुरु

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, शरद पवार यांनी सरकार स्थापन होणार असल्याचे सुतोवाच केले.

दोन अफगाण पत्रकारांना तालिबानकडून जबर मारहाण
‘वीजदरात सरासरी २% कपात हे वृत्त अर्धसत्य’
राणे कार्ड खेळून शिवसेनेला चेकमेट 

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचे सांगून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पाच वर्ष स्थिर असेल, असा विश्वास व्यक्त केला.

“सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार आहे. महाराष्ट्रात स्थिर सरकार असावे आणि राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात सरकार यशस्वी व्हावे, यासाठी जे काही योग्य असेल ते करण्याची आमची इच्छा आहे.” असे त्यांनी सांगितलं.

“किमान सामान कार्यक्रम ठरविण्यावर आणि सत्तेचे सूत्र ठरविण्यावर सध्या चर्चा सुरु आहे. ठोस निर्णय झाल्यानंतर फॉर्म्युला सर्वांसमोर उघड केला जाईल”, असे पवार यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले दोन दिवस शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना किमान सामान कार्यक्रम ठरविताना. डावीकडून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि छगन भुजबळ

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना किमान सामान कार्यक्रम ठरविताना. डावीकडून काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि छगन भुजबळ

शेती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्षातील आकडेवारी जास्त आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, केंद्राकडून शेतकऱ्यांना नव्याने भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांना ‘मी पुन्हा येणार’, असे म्हणत पवार यांनी टोला लगावला. “मी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून ओळखतो. पण ते ज्योतिषशास्त्राचे विद्यार्थी आहेत, हे मला आत्ताच कळले,” असे ते म्हणाले.

“मी क्रिकेटमध्ये प्रशासक होतो, मी क्रिकेट खेळत नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही कोपरखळी मारली. “राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. कधीकधी तुम्हाला वाटते, की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो,” असं गडकरी म्हणाले होते.

दरम्यान, राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबई येथे भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक झाली त्यामध्ये फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, की भाजप वगळता राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल,  भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही. असेही ते म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: