‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत

‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत

नवी दिल्लीः २३ ऑक्टोबर २०१८च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना पदावरून तडकाफडकी हटवले होते. त्या रात्रीनं

काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर
‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक

नवी दिल्लीः २३ ऑक्टोबर २०१८च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयचे महासंचालक आलोक वर्मा यांना पदावरून तडकाफडकी हटवले होते. त्या रात्रीनंतर एका अज्ञात भारतीय संस्थेने जी पिगॅसस स्पायवेअरची ग्राहक असू शकते त्यांनी वर्मा यांच्याशी संबंधित तीन मोबाइल क्रमांक पाळत करण्यासाठी निश्चित केले.

वर्मा जोपर्यंत तडकाफडकी हटवले जात नव्हते तोपर्यंत ते त्यांच्या अधिकारात व कायद्याच्या चौकटीत काहींवर नजर ठेवून होते पण त्यांच्या गच्छंतीनंतर त्यांच्यावरही पाळत सुरू झाली आहे, याची खबरबात त्यांना लागली नव्हती.

आलोक वर्मा यांची पदावरून गच्छंती झाली तेव्हा त्यांचा मोबाइल क्रमांक पेगॅससच्या रडारवर निश्चित करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी संबंधित अन्य १० मोबाइल क्रमांकही पेगॅसस स्पायवेअरसाठी निश्चित करण्यात आले. या १० मोबाइल क्रमांकापैकी ८ मोबाइल क्रमांकाचे अमनेस्टी इंटरनॅशनलच्या टेक लॅबने फोरेन्सिक परिक्षण केले असता या क्रमांकात पिगॅसस स्पायवेअरने शिरकाव केला होता, तर अन्य दोन क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.

वर्मा यांच्या फोनसहित त्यांची पत्नी, मुलगी व जावई यांचेही क्रमांक या यादीत होते. वर्मा यांच्या कुटुंबातील ८ क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित होते, असे द वायरला आढळून आले आहे.

वर्मा यांच्या व्यतिरिक्त सीबीआयतील दोन वरिष्ठ अधिकारी राकेश अस्थाना व ए. के. शर्मा यांचेही मोबाइल क्रमांक पिगॅससच्या डेटाबेसमध्ये आढळून आले आहेत.

२३ ऑक्टोबर २०१८मध्ये सीबीआयमध्ये असलेल्या राकेश अस्थाना यांनाही हटवण्यात आले होते. सध्या ते केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महासंचालक आहेत. तर ए. के. शर्मा जानेवारी २०१९ पर्यंत सीबीआयमध्ये होते. नंतर त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.

पिगॅसस स्पायवेअर डेटाबेसमध्ये अस्थाना, शर्मा, वर्मा व त्यांच्या कुटुंबियांतील काही नातेवाईकांचे क्रमांक काही काळापुरते निश्चित करण्यात आले होते.

वर्मा यांनी फोरेन्सिकसाठी तयारी दाखवली नाही. त्यामुळे त्यांच्या मोबाइलमध्ये पिगॅसस स्पायवेअरने शिरकाव केला की नाही याची माहिती मिळू शकत नाही.

सीबीआयमधील साठमारी

आलोक वर्मा व अस्थाना यांच्यात ज्येष्ठतेवरून सीबीआयमध्ये साठमारी सुरू होती. यात सीबीआयचे विशेष महासंचालकपदी असलेल्या अस्थाना यांच्यावर सीबीआयचे महासंचालक असणार्या वर्मा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोप करत एक फौजदारी गुन्हा दाखल केला आणि तेव्हा हा वाद पेटला.

२१ ऑक्टोबर २०१८मध्ये हा गुन्हा नोंदला गेला. त्या नंतर दोन दिवसांनी वर्मा यांनी अस्थाना यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार नोंद केली. त्यानंतर दिल्लीत हालचाली सुरू झाल्या. अस्थाना हे पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटचे समजले जात होते. अशा परिस्थितीत अस्थाना यांच्यावरच वर्मा यांनी गुन्हा दाखल केल्याने प्रशासनात खळबळ माजली होती. त्यात सीबीआयने राफेल विमान घोटाळ्याची फौजदारी चौकशी करावी अशी विरोधकांनी केलेली मागणीही वर्मा यांनी फेटाळली नव्हती.

वर्मा यांच्या गच्छंती अगोदर तीन आठवड्यापूर्वी ४ ऑक्टोबरला ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण व माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी वर्मा यांची सीबीआय कार्यालयात भेट घेतली व त्यांच्याकडे राफेल विमान घोटाळ्याची चौकशी करावी अशी तक्रार दिली. या भेटीवर सरकार नाराज होते.

त्या संदर्भातील वृत्त सर्वत्र आल्याने सरकारची पंचाईत झाली होती. या संदर्भात द वायरने शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राफेलची फाइल सीबीआयकडे असल्याची कबुली दिली होती पण ही फाईल आपण पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

इकडे सीबीआयने राफेलची चौकशी सुरू केली नसली तरी सीबीआय पुढे मागे सरकारला गोत्यात आणू शकते याचा धोका पीएमओला लक्षात आला होता. या दरम्यान वर्मा यांची सरकारने मध्यरात्री गच्छंती केली. त्यांची एका रात्रीत केलेली गच्छंती व त्यानंतर त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर पिगॅससमार्फत ठेवलेली पाळत बरेच काही सांगून जाते.

पुढे वर्मा यांनी ३१ जानेवारी २०१९ मध्ये भारतीय पोलिस सेवेतून निवृत्ती पत्करली. पिगॅससचा जो डेटाबेस उघडकीस आला आहे, त्यानुसार निवृत्तीच्या दिवसानंतर त्यांचे महत्त्व उरले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: