पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला

पिगॅससः हंगेरीतल्या पत्रकाराचा सरकारवर खटला

नवी दिल्लीः हंगेरीतील पत्रकार सैबोल्च पैनयी यांना त्यांच्या फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरचा शिरकाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता आपल्या देशातल्या

मोदी ‘हा’ छंद बाजूला ठेवणार का?
अमेरिकेला भारताचे अजब उत्तर
ब्रेक दि चेन निर्बंधः आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

नवी दिल्लीः हंगेरीतील पत्रकार सैबोल्च पैनयी यांना त्यांच्या फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरचा शिरकाव झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता आपल्या देशातल्या सरकारवरच खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉइशे वेलेने दिलेल्या वृत्तानुसार पैनयी यांना त्यांच्या फोनमध्ये पिगॅसस स्पायवेअरचा शिरकाव झाल्याचे लक्षात आले. पैनयी शोध पत्रकारिता करणाऱ्या डायरेक्ट 36 या वेबसाइटचे संपादक असून हंगेरीतील सरकारने आपल्यावर हेरगिरी केली आहे, असा त्यांचा आरोप आहे.

युरोपमध्ये पोलंड व हंगेरी देशांत अनेक पत्रकार, विरोधी पक्ष नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या फोनमध्ये पिगॅससने घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर एखाद्या पत्रकाराने सरकारवरच खटला दाखल करण्याची ही पहिलीच घटना आहे. हंगेरीत सहा महिन्यापूर्वी पिगॅससच्या घुसखोरीची घटना उघडकीस आली होती. पैनयी आता हंगेरीतील न्यायालये, देशातील डेटा संरक्षण प्राधिकरण संस्था एनएआयएच व इस्रायलमध्ये विविध खटले दाखल करणार आहे. तर हंगेरीतील प्रमुख नागरिक अधिकार संस्था हंगेरियन सिविल लिबर्टिंज युनियनच्या सहा सदस्यांवरही पिगॅसस मार्फत हेरगिरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. आता या सहा सदस्यांना एचसीयूएलकडून कायदेशीर मदत दिली जाणार आहे.

युरोपमध्ये हंगेरी व्यतिरिक्त पोलंडमध्येही सत्तारुढ पक्ष लॉ अँड जस्टिस पार्टीकडून विरोधी पक्ष नेत्यांवर पिगॅसस मार्फत पाळत ठेवण्यात आल्याचे दिसून आले होते. हंगेरी व पोलंडच्या सरकारने आपण नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी पिगॅसस वापरत होतो, अशी अप्रत्यक्ष कबुलीही दिली आहे. हंगेरीचे पंतप्रधान ओर्बन यांचा पक्ष फिदेज पार्टीच्या संसद सदस्यांनी व काही उच्चपदस्थ नेत्यांनी पिगॅससद्वारे हेरगिरी केल्याचे अनाहूतपणे कबूल केले होते. गृहखात्याकडून पिगॅससची खरेदी झाल्याचे यांचे म्हणणे होते.

पिगॅसस काय प्रकरण आहे?

एनएसओने पिगॅसस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जगातील १० देशांतील महत्त्वाचे राजकीय नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर, न्यायाधीश, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली होती. हे सॉफ्टवेअर एनएसओने अनेक देशांच्या सरकारला विकले होते. त्यामुळे सरकारला हेरगिरी करणे, माहिती मिळवणे सोपे गेले होते. या हेरगिरी प्रकरणात पिगॅसिसने अॅपल मोबाइलमध्ये शिरकाव करून माहितीची चोरी केली होती. या माहितीच्या चोरीचा व हेरगिरीचा खुलासा द वायर सहित १७ आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी उघडकीस आणला होता. पिगॅसस हेरगिरी प्रकरणाचे अनेक फोरेन्सिक पुरावे हाती लागले होते. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या सिटीझन लॅब व एम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने या पुराव्यांची पुष्टीही केली होती.  त्यामुळे जगभर खळबळ माजली होती.

पिगॅसस हेरगिरीमध्ये जगभरातील ५० हजार ग्राहकांचे मोबाइल क्रमांक आढळून आले होते. या मोबाइल क्रमांकवर हेरगिरी, पाळत ठेवली जात होती वा हेरगिरी व पाळत ठेवण्यासाठी हे क्रमांक निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली होती. भारतात ३००हून अधिक जणांचे मोबाइल क्रमांक निश्चित करण्यात आले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: