पहलू खान हत्याप्रकरणातील सर्व ६ आरोपी निर्दोष

पहलू खान हत्याप्रकरणातील सर्व ६ आरोपी निर्दोष

जयपूर : गोवंश तस्करीच्या संशयावरून राजस्थानमधील पहलू खान या मुस्लिम व्यक्तीच्या झुंडशाहीकडून झालेल्या हत्याप्रकरणात सर्व ६ आरोपींची पुराव्याअभावी बुधव

भाजप सेना एकत्रच
हिंदू राष्ट्राचे अंतिम ध्येय दृष्टिक्षेपात!
जॉर्ज फर्नांडिस आणि काश्मीर

जयपूर : गोवंश तस्करीच्या संशयावरून राजस्थानमधील पहलू खान या मुस्लिम व्यक्तीच्या झुंडशाहीकडून झालेल्या हत्याप्रकरणात सर्व ६ आरोपींची पुराव्याअभावी बुधवारी अलवार जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

मूळचे हरियाणात राहणारे पहलू खान दुग्धव्यवसाय करत होते आणि ते १ एप्रिल २०१७मध्ये जयपूरमध्ये दोन गायी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी गाय खरेदी केली आणि संध्याकाळी ७ वाजता घरी परतत असताना बहरोड पुलिया या ठिकाणी एका जमावाने त्यांची गाडी थांबवली आणि पहलू खान व त्यांच्या मुलाला गो-तस्करीच्या संशयावरून जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पहलू खान यांना रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे त्यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला.

या हत्याप्रकरणात पोलिसांनी ६ संशयितांना अटक केली होती. त्यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन होते. या सर्वांना अलवार येथील स्थानिक न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले.

‘तपास काळजीपूर्वक नव्हता’

पहेलू खान हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत निष्काळजीपणाने केल्याने पहलू खान यांची हत्या कशी झाली यापर्यंत हा तपास पोहचला नसल्याने आरोपींना संशयाचा फायदा मिळाला. पहलू खान यांच्या जबाबात त्यांनी सहा आरोपींची नावे घेतली होती ती नावे पोलिसांनी नोंदवली नव्हती, त्यामुळे तपासच कमकुवत होता अशी प्रतिक्रिया पहलू खान यांच्या कुटुंबियांचे वकील कासीम खान यांनी दिली.

पहलू खान यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबतही कैलाश हॉस्पिटल व बेहरोर सीएचएस यांची मते भिन्न होती. बेहरोर सीएचएसच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पहलू खान यांचा मृत्यू मारहाणीने झाला असल्याचे नमूद केले होते तर कैलाश हॉस्पिटलने त्यांचा मृत्यू हृदय बंद पडल्यामुळे झाला असे नमूद केले होते.

या खटल्याचा तपास व सुनावणी दोन वर्षे सुरू होती आणि सुनावणीदरम्यान ४७ साक्षीदार तपासले गेले होते. या खटल्यासंदर्भातील एक व्हिडिओ सादर करण्यात आला पण पुरावा म्हणून हा व्हिडिओ पुरेसा नसल्याचे न्यायालयाचे नमूद केले.

या प्रकरणातल्या दुसरा खटला अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असून तेथे ७ आरोपी आहेत तर अल्पवयीन आरोपींविरुद्ध बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: