१२ वी निकालाची टक्केवारी ९९.६३, कोकणाची सरशी

१२ वी निकालाची टक्केवारी ९९.६३, कोकणाची सरशी

मुंबईः १२ वीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्

१२ वी परीक्षेचा निकाल आज
१२वीचा निकाल आज दुपारी ४ वाजता जाहीर होणार
१२वी परीक्षाः १२ नोव्हें.पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

मुंबईः १२ वीच्या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ इतकी आहे.

त्याच बरोबर या परीक्षेस ९ विभागीय मंडळातून सर्व शाखांमधून ६६,८७१ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यापैकी ६६८६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९४.३१ टक्के इतकी आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.८१ टक्के तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा ९९.३४ टक्के इतका आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थींनींचा निकाल ९९.७३ टक्के तर विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५४ टक्के म्हणजे विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ०.१९ टक्क्याने जास्त आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९९.५९ टक्के लागला आहे.

एकूण १६० विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीत निश्चित केलेल्या भारांशानुसार गुणदान करण्यात आलेले असून त्यामध्ये ७० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १३,१९७५४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १३,१४,९६५
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९९.५४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी – ९९.७३
एकूण निकाल – ९९.६३ टक्के

सर्वाधिक निकाल कोकण विभाग – ९९.८१ टक्के
सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभाग – ९९.३४ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९९.५९ टक्के

शाखानिहाय निकाल –
विज्ञान शाखा – ९९.४५ टक्के
वाणिज्य शाखा – ९९.९१ टक्के
कला शाखा – ९९.८३ टक्के

९ विभागांची टक्केवारी

पुणे- ९९.७५ टक्के
नागपूर – ९९.६२ टक्के
औरंगाबाद – ९९.३४ टक्के
मुंबई- ९९.७९ टक्के
कोल्हापूर -९९.६७ टक्के
अमरावती – ९९.३७ टक्के
नाशिक – ९९.६१ टक्के
लातूर – ९९.६५ टक्के
कोकण – ९९.८१ टक्के
खासगीरित्या बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २६,३३२ होती. यापैकी ९९.४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर सायंकाळी ४ वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहे –

https://hscresult.11thadmission.org.in
https://msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: