३,२८८ तबलिगींना ४० दिवसांचे क्वारंटाइन – कोर्टात याचिका

३,२८८ तबलिगींना ४० दिवसांचे क्वारंटाइन – कोर्टात याचिका

नवी दिल्ली : दिल्लीतल्या सुल्तानपुरी येथील अनेक क्वारंटाइन सेंटरमध्ये गेले ४० दिवस ठेवण्यात आलेले पण कोरोनाचे संक्रमण नसलेले तबलिगी जमातीच्या सुमारे ३

‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’
निर्भया प्रकरण – ४ दोषींना २० मार्चला पहाटे फाशी
आर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग

नवी दिल्ली : दिल्लीतल्या सुल्तानपुरी येथील अनेक क्वारंटाइन सेंटरमध्ये गेले ४० दिवस ठेवण्यात आलेले पण कोरोनाचे संक्रमण नसलेले तबलिगी जमातीच्या सुमारे ३,२८८ सदस्यांना सोडण्यात यावे यासाठी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

हे ३,२८८ सदस्य विनाकारण क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून, या सदस्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळलेले नाही. काही सदस्यांच्या तीन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या सदस्यांनी त्यांची सुटका व्हावी यासाठी अनेक पत्रेही सरकारला पाठवली आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्त्या सबीहा कादरी यांनी दाखल केली असून सध्या क्वारंटाईनमध्ये असलेल्या तबलिगी सदस्यांनी १४ दिवसांचा क्वारंटाइन अवधी केव्हाच पूर्ण केला आहे. तरीही दिल्ली सरकारने अवैधपणे या सदस्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये डांबून ठेवले असून हा केंद्र सरकारच्या नियमांचा आणि राज्य घटनेचाही भंग होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महत्त्वाची बाब अशी की गेल्या ६ मे रोजी दिल्ली सरकारने क्वारंटाइन कालावधी पार केलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना घरी जाता येईल असे म्हटले होते. पण त्यांची अद्याप सुटका करण्यात आलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0