पाकिस्तानात पेट्रोल दराचा उच्चांक

पाकिस्तानात पेट्रोल दराचा उच्चांक

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने बुधवारी पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत १० पाकिस्तानी रुपये व १२ पाकिस्तानी रुपयांची वाढ केली. या वाढीमुळे पाकिस्तानमध

२४ महिला आमदारांचा फेसबुकवरचा वावर सोहळ्यांपुरताच
दलित कुटुंबाला मारहाणः कलेक्टर, एसपीला निलंबित
‘राफेल’ बाबत ‘पीएमओ’ कडून हस्तक्षेप

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकारने बुधवारी पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत १० पाकिस्तानी रुपये व १२ पाकिस्तानी रुपयांची वाढ केली. या वाढीमुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर १५९.८६ रु. तर डिझेलचा प्रती लीटर दर १५४.१५ रु. इतका झाला आहे. ही दरवाढ २८ फेब्रुवारीपर्यंत असेल असे सरकारचे म्हणणे आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या एकाएकी वाढलेल्या किंमतीवरून पाकिस्तानमधील विरोधी पक्ष इम्रान खान सरकारवर जोरदार टीका करू लागले आहेत.

इम्रान खान सरकारने केरोसिनचेही भाव वाढवले असून ते प्रती लीटर ११६.४८ पाकिस्तान रुपये इतके झाले आहे. तर इथॅऩॉलचा प्रती लीटर दर १५७.३५ पाकिस्तानी रुपया झाला आहे.

पाकिस्तानमध्ये पेट्रोलियम पदार्थावर अधिक कर असावेत अशी मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली होती. असे कर वाढवल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अधिक कर्ज देण्यात येईल, अशी अट होती. या अटीबरोबरच आंतरराष्ट्रीय तेल बाजारात प्रती बॅरल कच्च्या तेलाची किमत ९५ डॉलर इतकी झाली आहे. त्यामुळे कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याने पाकिस्तानच्या सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण अशा दरवाढीमुळे महागाई अधिक वाढेल असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानात सध्या प्रती लीटर पेट्रोलवरचा अधिभार १७.९२ पाकिस्तानी रुपये असून त्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून प्रती लीटर १२ पाकिस्तानी रुपये अबकारी कर लावण्यात आला आहे.

पाकिस्तानात पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्यात आलेला नाही. पण त्या ऐवजी सरकार पेट्रोल अधिभार व अबकारी करातून महसूल गोळा करते.

गेल्या जानेवारी महिन्यात पेट्रोलचे दर वाढणार होते पण तो निर्णय टाळण्यात आला होता.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: