मोदी सरकारची १० लाख रोजगार देणारी अग्निपथ योजना

मोदी सरकारची १० लाख रोजगार देणारी अग्निपथ योजना

नवी दिल्लीः येत्या दीड वर्षांत १० लाख रोजगार होतील असे आश्वासन मोदी सरकारने मंगळवारी दिले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्करात अल्पकालीन से

नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
तिहेरी तलाक कायदाः १ वर्षानंतर
गांधी, थोरो आणि सविनय प्रतिकार

नवी दिल्लीः येत्या दीड वर्षांत १० लाख रोजगार होतील असे आश्वासन मोदी सरकारने मंगळवारी दिले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्करात अल्पकालीन सेवा देणाऱ्या अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार मानसिक व शारीरिकदृष्ट्या फिट असलेल्या ३२ वर्षांखालील युवकांना ४ वर्षांसाठी भारतीय लष्करात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. नंतर हे वय २६ करण्यात येणार आहे. या प्रकारच्या योजना अनेक देशांमध्ये लागू असून त्यांचा अभ्यास करून ही योजना भारतीय लष्करात लागू करण्यात येत असल्याचे राजनाथ सिंग यांनी सांगितले. अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्करात सामील होणाऱ्या युवकांना उत्तम वेतन मिळेल, रोजगारही मिळेल व त्याने जीडीपीत भर पडेल असे राजनाथ सिंग म्हणाले. देशाच्या लोकसंख्येत तरुणांची संख्या अधिक असल्याने जगातील सर्वोत्तम असे भारताचे लष्कर तरुणांच्या समावेशामुळे बनू शकते. याने देशातील संरक्षण व्यवस्था मजबूत होईल, देशाला कुशल मनुष्यबळाचा लाभ होईल, असेही सिंग म्हणाले.

अग्निपथ योजनेचे स्वरुप

या योजनेत सामील होणाऱ्यांना ‘अग्निवीर’ म्हणून ओळखले जाईल. ही संख्या प्रत्येक वर्षी ४० ते ५० हजार इतकी असेल व वर्षातून दोनदा ती करण्यात येईल. या योजनेतील पदे अधिकार पदाच्या खालील असतील. ही भरती ४ वर्षांसाठी असेल. त्या नंतर प्रत्येक जवानाला १० लाख रुपये मिळतील.

या योजनेत सामील झालेल्या जवानांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण मिळेल. त्यानंतर तो साडे तीन वर्षे सैन्यात काम करेल. चार वर्षांच्या सेवेनंतर २५ टक्के जवानांना महिन्याभरानंतर पुन्हा सैन्यात भरती करून घेतले जाईल.

या योजनेत सुरुवातीला ३० हजार रुपये महिना पगार असेल. अखेरच्या चौथ्या वर्षी हा पगार ४० हजार रु. इतका असेल. सरकार पगाराच्या ३० टक्के रक्कम बचत म्हणून आपल्यापाशी ठेवेल आणि तो सेवा निधीमध्ये जमा करेल. उर्वरित ७० टक्के पगार खात्यात जमा होईल. एका जवानाला ४ वर्षांची सेवा संपल्यानंतर करमुक्त १० ते १२ लाख रुपये मिळतील. ४ वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीराचा चकमकीत मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम म्हणून ४८ लाख रु. संबंधित कुटुंबाला मिळेल. या शिवाय उर्वरित सेवेचा पगारही कुटुंबाला देण्यात येईल. सेवेच्या कालावधीत अपंगत्व किंवा शारीरिक दुखापत झाल्यास, त्या  जवानाला एक वेळ आर्थिक मदत दिली जाईल.

हा नवा जुमला

दरम्यान मोदी सरकारच्या १० लाख रोजगाराच्या घोषणेची काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली आहे. ८ वर्षांपूर्वी दरवर्षी २ कोटी रोजगार देशात उत्पन्न होतील असे आश्वासन देत मोदी सरकारने फसवले होते, आता १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन देशाला देण्यात आहे. हे सरकार जुमल्यांचे नाही तर महाजुमल्यांचे सरकार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. आपले पंतप्रधान रोजगार बनवण्यात नव्हे तर नोकऱ्या उत्पन्न होतील असे बनवण्यात एक्स्पर्ट असल्याचा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला.

दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. ईडीने दोन दिवसांत सुमारे १७ तास राहुल गांधी यांची चौकशी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0