‘५०० शेतकरी काय माझ्यासाठी मेले?’

‘५०० शेतकरी काय माझ्यासाठी मेले?’

चंदीगड/भवानीः शेतकरी आंदोलनाच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अत्यंत घमेंडखोर स्वरुपाची होती व त्यांची भेट घेतल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांमध

‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’
‘तबलिगींसारखी परिस्थिती दिल्लीच्या वेशीवर होईल का?’
शेतकरी संघटनांचा ८ डिसेंबरला भारत बंद

चंदीगड/भवानीः शेतकरी आंदोलनाच्या बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अत्यंत घमेंडखोर स्वरुपाची होती व त्यांची भेट घेतल्यानंतर पहिल्या ५ मिनिटांमध्येच आमच्यात वाद झाल्याचा किस्सा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हरियाणातील दादरी येथे एका कार्यक्रमात जाहीर सांगितला. या किस्स्याचा व्हीडिओ ईटीव्ही भारतने सोशल मीडियात प्रसिद्ध केला. त्यावरून वादळ उठल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी सारवासारव केली.

सत्यपाल मलिक म्हणाले, दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाबाबत आपण मोदी यांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा मोदींपुढे काढला. या आंदोलनात ५०० हून अधिक शेतकरी मरण पावले आहेत, असे म्हटले असता, मोदी यांनी अत्यंत घमेंडीत ‘हे लोक माझ्यासाठी मेले आहेत का’, असा प्रतिप्रश्न केला. ‘तू कुत्रा मेला तरी पत्र पाठवतोस, ते माझ्यासाठी मेलेत का?’

मोदींच्या प्रश्नावर मी म्हटले, ‘हो ते तुमच्यासाठीच मेलेत. तुम्ही राजे आहात व त्यांच्यामुळे तुम्ही आज राजे आहात.’

त्यावर मोदींनी या संदर्भात ‘अमित शहांची भेट घ्या’, असे सुनावले.

त्यानंतर आपण अमित शहा यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘सत्यपाल, त्यांची (मोदींची) अक्कल पेंड खायला गेली आहे, तुम्ही निर्धास्त राहा. एके दिवशी त्यांना सगळं समजून येईल. जवळचे काही लोक त्यांचे मन भरतात.’

सत्यपाल मलिक यांच्या या वक्तव्याने गदारोळ उडाल्यानंतर काही तासांत मलिक यांनी अमित शहा यांनी मोदींविषयी असे काहीच उद्गगार काढले नाहीत अशी सारवासारव केली. अमित शहा म्हणाले, ‘तुम्ही जे काही सांगत आहात ते त्यांना काही दिवसांनी समजेल’.

आता माझा मुद्दा मोदींना समजल्याने त्यांनी तीन शेती कायदे मागे घेतले, असे मलिक म्हणाले.

राज्यपालपदी असताना यापूर्वी सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारच्याविरोधात अनेक बेधडक वक्तव्ये केली आहेत. त्यांचे शेतकरी आंदोलनालाही समर्थन होते. ऑक्टोबर २०२१मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत तर भाजप पुढील वेळा सत्तेत येणार नाही, असे विधान केले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण आपले पदही सोडण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते.

लखीमपुर खीरी हत्याकांड प्रकरणावर त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा, ते मंत्रिपदावर राहण्यास लायक नाही, असे विधान केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: