मोदींची सी प्लेन सेवाः गुजरातवरचा बोजा

मोदींची सी प्लेन सेवाः गुजरातवरचा बोजा

नवी दिल्लीः दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाजत-गाजत सुरू झालेली देशातील पहिली अशी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी नजीकची केवडिया

लोकशाही म्हणजे स्वगत नव्हे!
देशात २०२४ अखेर एनआरसी पूर्ण : अमित शहा
पक्षांतराचे वारे, नेत्यांचे वातकुक्कुट

नवी दिल्लीः दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाजत-गाजत सुरू झालेली देशातील पहिली अशी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी नजीकची केवडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट या दरम्यानची विमान सेवा (सी प्लेन सर्विस) ही राज्याच्या तिजोरीवर परिणाम करणारी असून ती आर्थिक दृष्ट्या परवडणारी नसल्याचे गुजरात सरकारचे म्हणणे आहे. पण मोदींनी सुरू केलेली ही सेवा नेमक्या कोणत्या कारणांमुळे अजून उड्डाण घेऊ शकलेली नाही, त्याची माहिती आरटीआयतंर्गत एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एआयआय) दिलेली नाही.

डेक्कन हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार एआयआयने केवडिया ते अहमदाबाद दरम्यानच्या सी प्लेन सेवेवर किती खर्च केला जाणार आहे किंवा केला गेला आहे, याची माहिती सार्वजनिक स्तरावर देण्यास नकार दिला आहे.

केवडिया ते अहमदाबाद या सीप्लेन सर्विसचा प्रकल्प अजून विकसित होत आहे, तो पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरच्या खर्चाची आकडेवारी लक्षात येईल. या योजनेवरचा भांडवली खर्च उडान योजनेंतर्गत भारत सरकार उचलणार आहे, असे उत्तर एआयआयने माहिती अधिकार अर्जांतर्गत दिले आहे.

या सीप्लेन प्रकल्पाची माहिती आताच उघड केल्यास त्याचा परिणाम संपूर्ण प्रकल्पावर व राज्य सरकारच्या आर्थिक हितावर होईल असे कारण एआयआयने दिले आहे.

मोदींनी नुकतेच ३१ डिसेंबर २०२० रोजी केवडिया ते साबरमती रिव्हरफ्रंट असा सीप्लेन प्रवास केला होता. त्या अगोदर त्यांनी साबरमती नदी (अहमदाबाद) ते धारोई धरण (मेहसाणा) असा सीप्लेन प्रवास राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ असताना २०१७ रोजी केला होता.

२०१७ मध्ये उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात केवळ २५ दिवस ही सेवा सुरू राहिली पण नंतर ती थांबवण्यात आली. देशातील पहिली सीप्लेन सेवा म्हणून तिचा गाजावाजा करण्यात आला होता. ही सेवा स्पाइस जेटकडून सुरू होती पण ही सेवा बंद पडल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते मनीश दोशी यांनी या सेवेवर होणार्या खर्चाचा मुद्दा उपस्थित करत गुजरातमधील रुपानी सरकारवर निशाणा साधला. सध्याच्या काळात पिण्याचे पाणी, शिक्षण व आरोग्य या तीन बाबींवर सरकारी खर्च कमी होत असताना त्यात कोरोना महासाथीने राज्य बेजार झाले असताना सरकारने कशाला प्राधान्य द्यायला पाहिजे यावर विचार करण्याची वेळ आल्याची टीका जोशी यांनी केली होती. गुजरातमधील भावनगर ते सूरत ही रो-रो सेवा पूर्वीच बंद पडली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

स्पाइस जेटच्या प्रवक्त्यांनी ही सीप्लेन सेवा ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार असल्याचे सांगितले. सध्या स्थगित आलेली सेवा विमानांच्या देखभालीमुळे आहे. विमानांची देखभाल अहमदाबाद येथे होते व अन्य कामासाठी ते विमान मालदीव येथे कंपनीच्या कारखान्यात पाठवले गेले आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: