पाकव्याप्त काश्मीर जम्मू-काश्मीरच्या नकाशात

पाकव्याप्त काश्मीर जम्मू-काश्मीरच्या नकाशात

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर या नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा तर लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या नकाशात गिलगिट-बाल्ट

जम्मू व काश्मीरमध्ये कलम ३११ची अंमलबजावणी
बाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कटः न्या. लिबरहान
आंबेडकरी चळवळ आणि भीमगीते

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीर या नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा तर लडाख या नव्या केंद्रशासित प्रदेशाच्या नकाशात गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रदेश सामील करण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी जम्मू व काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले असल्याने केंद्रीय गृहखात्याने भारताचा नवा नकाशा प्रसिद्ध केला आहे. जम्मू व काश्मीरच्या नव्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद सामील करण्यात आले आहे.

१९४७मध्ये जम्मू व काश्मीर राज्यात कठुआ, जम्मू, उधमपूर, रियासी, अनंतनाग, बारामुल्ला, पुंछ, मीरपूर, मुझफ्फराबाद, लेह व लडाख, गिलगीट, गिलगीट वजारत, चिल्हास व आदिवासी प्रदेश असे १४ जिल्हे होते. २०१९मध्ये जम्मू व काश्मीर सरकारने १४ जिल्ह्यांची पुनर्रचना करत त्याचे २८ जिल्हे केले. या नव्या जिल्ह्यांमध्ये कुपवारा, बंदिपूर, गंदरबाल, श्रीनगर, बडगाम, पुलवामा, शोपियन, कुलगाम, राजौरी, रामबन, दोडा, किश्तवार, सांबा व कारगील अशा जिल्ह्यांचा समावेश होता. आता कारगिल जिल्ह्याचे लेह व लडाख असे दोन जिल्हे करण्यात आले आहेत.

गेल्या ऑगस्टमध्ये संसदेने जम्मू व काश्मीर राज्याचे विभाजन करून त्याचे जम्मू व काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश केले होते. त्यामुळे नकाशा बदल करणे आवश्यक होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0