त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांचा अचानक राजीनामा

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांचा अचानक राजीनामा

नवी दिल्लीः त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी शनिवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०२३ साली त्रिपुरात विधानसभा निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात नेतृत्व बदल करून निवडणुकांची तयारी केल्याचे या घडामोडींतून दिसून येत आहे. भाजपने बिप्लव कुमार देव यांच्या जागी माणिक साहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आहेत.

बिप्लव कुमार देव यांच्या कारभाराविरोधात पक्षातच असंतोष होता. काही दिवसांपूर्वी तीन आमदारांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतरही ही महत्त्वाची घडामोड घडली. आपण पक्षासाठी यापुढेही काम करत राहू, पक्षसंघटन अधिक मजबूत करू अशी प्रतिक्रिया देव यांनी पीटीआयला दिली.

शुक्रवारी बिप्लव देव यांना दिल्लीत तातडीने बोलावण्यात आले होते. त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली व शनिवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

नवे मुख्यमंत्री माणिक साहा हे राज्यसभा सदस्य असून त्यांची होणारी रिक्त जागा बिप्लव कुमार देव यांना दिली जाईल, अशी चर्चा आहे. माणिक साहा हे २०१६मध्ये भाजपमध्ये सामील झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS