गुजरातमध्ये पराभवाचा केजरीवालांचा भाजपला इशारा

गुजरातमध्ये पराभवाचा केजरीवालांचा भाजपला इशारा

नवी दिल्लीः गुजरातमधील पेपरफुटी प्रकरण, शाळा, आरोग्याची दयनीय व्यवस्था व भ्रष्टाचारयुक्त प्रशासकीय कारभारावर टीका करत आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपचा

दिल्लीत काँग्रेसचा आत्मघात की भाजपविरोधी खेळी?
आपची लाट नव्हे सुनामी
पंजाब मंत्रिमंडळः ७ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, ९ कोट्यधीश

नवी दिल्लीः गुजरातमधील पेपरफुटी प्रकरण, शाळा, आरोग्याची दयनीय व्यवस्था व भ्रष्टाचारयुक्त प्रशासकीय कारभारावर टीका करत आगामी विधानसभा निवडणुकांत भाजपचा पराभव करू, भाजपचे गर्वहरण करू असे विधान रविवारी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका जाहीर सभेत केले.

रविवारी गुजरातच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपकडून पहिलीच ही जाहीर सभा होती. आपने ही सभा भडोच जिल्ह्यातील चंदेरिया गावात घेतली. हा भाग आदिवासी बहुल असून सभेला भडोच व नर्मदा जिल्ह्यातील आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर लोक सभेला आले होते. आपने निवडणूक रणनीती म्हणून या भागातील आदिवासी नेते छोटूभाई वसावा यांच्या भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी)शी युती केल्याची घोषणा केली. रविवारी आदिवासी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात बीटीपीचे सर्वेसर्वा छोटूभाई, पक्षाध्यक्ष व आमदार महेश वसावा उपस्थित होते. या संमेलनात आपने बीटीपीशी युती करत आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.

आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधत केजरीवाल यांनी, आपचा धसका घेऊन भाजप सरकार राज्यात लवकर निवडणुका घेण्याच्या तयारीला लागल्याचा आरोप केला. राज्यातल्या निवडणुका डिसेंबरमध्ये घेतल्या तर गुजरातची सत्ता आपकडे जाईल, अशी भाजपला भीती वाटत आहे. पण निवडणुका केव्हाही होऊ देत, भाजपला आम्ही हरवू असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी आपल्या भाषणात दिल्लीहून सूरतला येताना एका भाजप नेत्याशी झालेल्या चर्चेतला संवाद उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले, ‘गुजरातमध्ये गेले २७ वर्षे भाजपचे राज्य आहे पण एवढ्या वर्षांत तुम्ही येथे काम का केले नाही? त्याला भाजप नेत्याने उत्तर दिले आम्हाला येथे काम करण्याची का गरज आहे, जनता आम्हाला मते देते. काँग्रेसचे नेते आमच्या खिशात आहेत, त्यामुळे भाजपला येथे निवडणूक अशी लढवावीही लागत नाही.’

गुजरातमधील भाजप नेत्याचे हे म्हणणं ऐकून या पक्षाला किती अहंकार आला आहे, हे मला कळाले. मतदारांकडून भाजपचा हा अहंकार मोडून काढण्याची वेळ आली असून आम्ही तुम्हाला सत्तेतून उखडून टाकू असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी आपल्या भाषणात काँग्रेस व भाजपमधील चांगल्या नेत्यांनी आपकडे यावे असेही आवाहन केले. गुजरातच्या मतदारांनी आपल्या अवमानाचा बदला घ्यावा. काँग्रेस आता संपली आहे त्यांना मते देऊन काही फायदा नाही. या पक्षातल्या चांगल्या, विचारी नेत्यांनी आपकडे यावे आपण मिळून काम करू असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

भडोच व नर्मदा पट्टातील बीटीपी पक्ष हा पूर्वी काँग्रेससोबत होता. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकात बीटीपीने एआयएमआयएमशी युती केली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0