बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार

नवी दिल्लीः बिहार सरकार जातनिहाय जनगणना करणाऱ असून या संदर्भात येत्या २७ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यां

मुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८
नैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ
बिहार-उ. प्रदेश सीमेवर गंगेत ७१ मृतदेह आढळले

नवी दिल्लीः बिहार सरकार जातनिहाय जनगणना करणाऱ असून या संदर्भात येत्या २७ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय बैठकीत जातनिहाय जनगणनेचा विषय मांडून त्यावर सर्वांची मते आजमावली जातील. या बैठकीचा एक प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल व अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नितीश कुमार म्हणाले.

आम्ही या जातनिहाय जनगणनेविषयी सर्व पक्षांशी चर्चा करत आहोत, त्यांची अंतिम मते अद्याप आलेली नाहीत. जातनिहाय जनगणनेविषयी सर्व बाजूने विचार सुरू आहे, असेही नितीश कुमार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी प्रमुख विरोधी पक्ष राजदचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारला जातनिहाय जनगणनेविषयी ७२ तासात निर्णय घ्यावा असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर सरकारकडून जातनिहाय जनगणना लवकर सुरू केली जाईल असे आश्वासन तेजस्वी यादव यांना दिले होते.

या विषयासंदर्भात नितीश कुमार यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या वर्षी भेटही घेतली होती. पण त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. जातनिहाय जनगणनेवरून सत्ताधारी जनता दल (संयुक्त) व भाजपमध्ये सहमती दिसत नसल्याने हा मोठा राजकीय पेच तयार झाला आहे. केंद्रातील भाजप सरकारचा अशा जनगणनेला विरोध आहे, त्यामुळे राज्यातील भाजप पक्ष अडचणीत आला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0