द्रौपदी मुर्मू यांना भाजपाकडून राष्ट्रपती पदाची उमेदवारी

द्रौपदी मुर्मू यांना भाजपाकडून राष्ट्रपती पदाची उमेदवारी

भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत. भारतीय जन

द्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा की ममता विरुद्ध सोनिया?
शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा
द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत. भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपतीपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली.

भारतीय जनता पार्टीच्या संसदीय बोर्डाची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा या बैठकीत उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षिका म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. ६४ वर्षीय मुर्मू या ओडिशातून भाजपचे आमदार म्हणून दोनदा निवडून आल्या होत्या. जेव्हा भाजपने बिजू जनता दलाला (बीजेडी) पाठिंबा दिला तेव्हा नवीन पटनायक मंत्रिमंडळात त्या मंत्री होत्या. २०१५ ते २०२१ या कालावधीत त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या.

पटनायक यांनी मुर्मूंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या बाजूने संख्याबळ असल्याने तिची निवडणूक आता औपचारिकता आहे.

सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान होणाऱ्या मुर्मू या आदिवासी समुदायातील पहिल्या सदस्य असतील. प्रतिभा पाटील यांच्यानंतर राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरणार आहेत.

सतरा विरोधी पक्षांनी यापूर्वी यशवंत सिन्हा यांना या पदासाठी संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले होते. राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार तेलंगणा किंवा ओडिशामधून असेल, जेथे नवीन पटनायक यांच्या निवृत्तीनंतर भाजपला सत्ता काबीज करायची आहे, अशी अटकळ बांधली जात होती. मोदी सरकारचा प्रत्येक निर्णय हा निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन घेतला जात असल्याने, ओडिशा आदिवासी समुदायातून नेता निवडणे हा त्याचाच भाग आहे. मुर्मूंचा एक स्वच्छ पार्श्वभूमी आहे. एक आदिवासी म्हणून ओडिशाच्या राजकारणातील उच्चवर्णीय वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या आणि पश्चिम ओडिशातील आदिवासी लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या त्या ठरू शकतात.

२०१९ मध्ये, भाजपने ओडिशाच्या आदिवासीबहुल प्रदेशात आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केली होती. छत्तीसगडमध्ये पुढील विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय इतिहासात प्रथमच एका आदिवासीला सर्वोच्च घटनात्मक पदावर बसविल्याचा राजकीय संदेश आदिवासी समुदायांमध्ये भाजप देऊ इच्छितो.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील भाजपसाठी आदर्श पर्याय ठरले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर प्रदेशातील गैर-जाटव दलितांच्या मोठ्या वर्गावर प्रभाव टाकण्यात आला. तसेच  देशभरातील दलित समुदायांना सकारात्मक संकेतही देण्यात आले होते.

मुर्मूच्या नामांकनाने हे निश्चित झाले आहे. की बीजेडी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देईल आणि यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा मुर्मूंची निवड करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती, तेलुगु देसम पार्टी आणि वायएसआर कॉंग्रेस पक्ष यांसारख्या पक्षांवर दबाव एएल. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून समसमान अंतरावर असल्याचा दावा करणारी बीजेडी इतर कोणापेक्षाही ओडिशातील उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0