आपची वाटचाल सांप्रदायिक राजकारणाला कवटाळण्याकडे?

आपची वाटचाल सांप्रदायिक राजकारणाला कवटाळण्याकडे?

पंजाबमधील विजयानंतर आम आदमी पार्टी अर्थात आप आता दोन राज्यांमध्ये सरकार चालवत आहे. त्यामुळेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असे राष्ट्रीय विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त करण्यास आप सक्षम आहे अशी एक सामान्य धारणा रुजत चालली आहे. हे स्थापन प्राप्त करण्यासाठी काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून झगडत आहे.

आसाममध्ये मतघोटाळा : मतदार ९० प्रत्यक्षात मते १८१
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीचा अर्थ काय?
लखीमपूर ट्विटमुळे वरुण गांधींना भाजप कार्यकारिणीतून डच्चू?

पंजाबमधील विजयानंतर आम आदमी पार्टी अर्थात आप आता दोन राज्यांमध्ये सरकार चालवत आहे. त्यामुळेच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असे राष्ट्रीय विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त करण्यास आप सक्षम आहे अशी एक सामान्य धारणा रुजत चालली आहे. हे स्थापन प्राप्त करण्यासाठी काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून झगडत आहे.

विस्तार करण्यासाठी आपने स्वत:ला आक्रमकपणे ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून प्रस्थापित केले आहे, यासाठी आपला हिंदू धर्मावरील अधिकार प्रकर्षाने पुढे आणला आहे. यातूनच आप खरोखर भाजपाला पर्याय ठरू शकेल की तो भाजपच्या तुलनेत सफाईदार भासेल असे सांप्रदायिक धोरण ठेवून ‘सौम्य भाजपा’ स्वरूपाचा पक्ष ठरेल असा वाद पेटला आहे.

आपले हिंदू लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे धोरण भाजपाच्या तुलनेत मुळातून वेगळे आहे, कारण, ते अल्पसंख्याकांच्या तिरस्काराच्यावर आधारित नाही, अशा युक्तिवादाच्या माध्यमातून आप स्वत:चा बचाव करत आहे.

दुसऱ्या बाजूला, भाजपाच्या वर्चस्वामुळे आता बहुसंख्याक धर्मांना सार्वजनिक क्षेत्रात आदराचे स्थान देणे हा राजकीय नियम झाला आहे आणि बहुतेक ‘सेक्युलर पक्ष’ही याला बळी पडले आहेत. या पार्श्वभूमीवर, बहुसंख्याकांच्या धर्माचे लाड करणे आणि हिंदुत्ववाद्यांना उत्तेजन देणे यांमुळे हिंदू मूलतत्त्ववाद्यांची मते आकर्षित करून घेणे शक्य होईल यावर आपचा विश्वास असल्याचे दिसत आहे. हे मतदार आत्तापर्यंत भाजपासोबत राहिले आहेत.

अर्थात, गेल्या आठवड्यात आपने भाजपाला मागे टाकण्याच्या उद्देशाने घेतलेली भूमिकेतून असे दिसून येते की, कट्टरतेचाच आधार घेऊन आप भाजपावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.

काही नमुने: एक, लष्करावर इफ्तार पार्टीबद्दलचे ट्विट डिलीट केल्याबद्दल टीका करणारे पत्रकार रिफात जावैद यांच्यावर आपचे आमदार नरेश बलयान यांनी अगदी सहजपणे ‘तालिबानी’ आणि ‘जिहादी’ असे शिक्के मारले. मनीष सिसोदिया व आतिशी मार्लेना यांच्यासह आपच्या काही आघाडीच्या नेत्यांनी दिल्लीतील जहांगिरपुरी येथे झालेल्या दंगलींसाठी रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांना दोष देत या समुदायांबद्दल पक्षाला असलेले पूर्वग्रह दाखवले तसेच तिरस्कारही पसरवला.

मूर्ख धार्मिकतेच्या पलीकडे

सर्वप्रथम आपने करदात्यांनी दिलेल्या पैशातून सरकार प्रायोजित पूजा, तीर्थयात्रा आदींच्या माध्यमातून बहुसंख्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला. हे नक्कीच योग्य नव्हते. सरकारी संसाधनांतून धर्माला बढावा देणे म्हणजे करदात्या पण धर्म न मानणाऱ्या नास्तिक तसेच कोणतीच विचारधारा न मानणाऱ्यांच्या पैशांचा गैरवापरच होता.

शिवाय, सरकार अनेक आवश्यक व तातडीची कामे करण्यात कमी पडत असताना, करदात्यांकडून येणारी तुरळक संसाधने धार्मिक कारणांसाठी वापरण्याचा हा प्रकार होता. तरीही त्यातून समुदायाचे काही नुकसान होत नाही आणि म्हणून मूर्ख धार्मिकता म्हणून सोडून दिले जाऊ शकते.

हे एका वेगळ्या स्तरावर नेत, आपने बहुसंख्याक शक्तींकडून लक्ष्य केल्या जाणाऱ्या समुदायांच्या बाजूने उभे राहण्यास नकार दिला. दिल्ली दंगलींमध्ये आणि अन्य काही वेळा हेच आढळून आले. आपच्या भूमिकांबद्दलच्या समस्या बहुस्तरीय आहेत. आप सरकारने दिल्लीतील मुस्लिमांना असहाय्य अवस्थेत सोडून दिले आहेत. मुस्लिमांना राजकीय स्तरावर आवाजच नव्हता, कारण, आपने राजकीयदृष्ट्या फायदेशीर असे मौन राखणे पसंत केले होते. आपने आपले संघटने व नेतृत्व सक्रियरित्या तैनात केले असते, तर अनेक प्राण वाचले असते. सांप्रदायिक शक्ती व मुस्लिम कुटुंबांना व त्यांच्या व्यवसायांना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात आप रस्त्यावर उतरले असते, तर अनेक निराधार नागरिकांना न्याय मिळाला असता.

दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था आपल्या अखत्यारीत नाही याची ढाल आपने केली तरी आपण ज्या लोकांचे एक राजकीय पक्ष म्हणून प्रतिनिधित्व करतो, त्यांची जबाबदारी आप सरकार टाळू शकत नाही. सांप्रदायिक शक्तींद्वारे लक्ष्य केल्या जाणाऱ्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिकार आवश्यक नसतात, तर प्रवाहाच्या विरोधात उभे राहण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. अशा परिस्थितीत भाजपने घुसळण चालवलेली असताना आपने मौन राखणे नैतिकतेचा प्रश्न आहे. म्हणूनच आपने राजकीय फायद्यासाठी आपल्या अभ्यासपूर्ण शांततेच्या माध्यमातून, धार्मिक मुद्दयांवर मतदारांचे धृवीकरण करण्याच्या प्रयत्नांपासून, भाजपाला परावृत्त केले.

मात्र, गेल्या आठवड्यात आपने सांप्रदायिक राजकारणाला कवटाळण्याच्या दिशेने आणखी मोठे पाऊल टाकले. आता पक्षाचे आघाडीचे नेते मुस्लिमांबद्दलच्या द्वेषाचा व पूर्वग्रहांचा सक्रियपणे फायदा उचलताना दिसत आहेत आणि राजकीय एकत्रीकरणासाठी याचा वापर करत आहेत.

मनीष सिसोदिया व आतिशी मार्लेना यांसारख्या आप नेत्यांनी रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लिमांना ‘बेकायदा वसवल्या’बद्दल भाजपावर टीकास्त्र सोडले. आपने याच समुदायांना संघर्षासाठी जबाबदार धरले व त्यांच्याविरोधात कारवाईची मागणीही केली आणि द्वेषाने भरलेल्या सांप्रदायिक एकत्रीकरणाच्या चिखलात पाय घातले. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांबद्दलच्या द्वेष, भीती व पूर्वग्रहाचा फायदा घेण्यासाठीच ही टीका होती. कारण, आपनेही सोयीस्कररित्या या समुदायाला बळीचा बकरा केले. त्यातील समाजकंटक आणि तो संपूर्ण समुदाय यांच्यातील भेद जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हा द्वेष व पूर्वग्रह इस्लामोफोबियानेच प्रेरित आहे, कारण, अन्य कोणत्या स्थलांतरितांबद्दल भारतामध्ये द्वेषाची भावना दिसत नाही. मुस्लिम हे त्रासदायक आहेत, ते दयेस पात्र नाहीत या सांप्रदायिक समजांना अशा प्रकारची टीका खतपाणी घालते. दुर्दैवाने आपने हेच केले. त्याबरोबरच आधीपासून पूर्वग्रहाचा धोका असलेल्या सीमांत समुदायांना आपने आपल्या राजकीय फायद्यासाठी लक्ष्य केले.

त्याचप्रमाणे पत्रकार रिफात जावैद यांच्यावर सहजपणे ‘तालिबानी’ व ‘जिहादी’ असे शिक्के मारण्यातून घातक कट्टरता अनेक अर्थांनी दिसून येते. आप नेते सर्व मुस्लिमांवर संशय कसा घेतात हे यातून कळते. याचा मुस्लिमांवर फार वाईट परिणाम होतो, कारण, त्यांनी कोणतेही मतभेद दर्शवणारे विधान केले तर त्यांच्या निष्ठेवर शंका घेतली जाते.

आपच्या राजकारणात सुक्ष्म पदरांना वाव नाही, हेही नरेश बलयान यांनी रिफात जावैद यांच्यावर केलेल्या आक्रमक टीकेतून, स्पष्ट होते. यातून भेदांचा आदार राखणाऱ्या लोकशाही संवेदनशीलतेचा अभावही दिसून येतो. रानटीपणा न करता केव्हा मतभेद व्यक्त करणाऱ्याच्या हेतूंबद्दल शंका न घेता, मतभेद व्यक्त करण्याबद्दल सहमती राखण्यातील असमर्थता यातून दिसून येते.

आपचा जागतिक दृष्टिकोन

मुस्लिम हे कायमस्वरूपी ‘अन्य’, त्रासदायक तसेच समाजाच्या साच्यात बसण्यास असमर्थ आहेत असाच आपचा जागतिक दृष्टिकोन कदाचित असावा, असे या उदाहरणांतून दिसून येते. या दृष्टिकोनाचा सक्रिय प्रसार होऊ शकतो आणि राजकीय एकत्रीकरणासाठी तो कायमस्वरूपी वापरला जाऊ शकतो.

हा दृष्टिकोन भूतकाळात कट्टरतेच्या विरोधात उभा राहिला नाही, यामागील कारण तो राजकीयदृष्ट्या फायदेशीर होता असे नाही, तर कदाचित आपची या जागतिक दृष्टिकोनाला कधीच हरकत नव्हती हे आहे. आपची पालक संस्था इंडिया अगेन्स्ट करप्शन संघाशी जोडलेली होती हे कदाचित यामागील कारण असू शकेल. कदाचित म्हणूनच हिदुत्ववादी विचारांचे कपिल मिश्रा व कुमार विश्वास यांना आपशी विचारसरणीविषयक समस्या नसाव्यात (त्यांनी आप सोडले कारण, त्यांचे अहंकार व महत्त्वाकांक्षा आपमध्ये सामावले जाऊ शकले नाही).

याशिवाय आप या सर्व प्रकरणांमध्ये धोक्याची रेषा आखून घेऊन आणि आपला ‘इन्सानियत’ हा मुद्दा लावून धरू शकेल. कट्टरतेबाबत भाजपाला मागे टाकण्याची खरेच गरज आहे का यावर आपने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. राजकीय पक्षासाठी सर्व मतदार, अगदी छोटे समुदायही, आपल्याकडे वळवून घेणे गरजेचे असते का? आणि त्यासाठी काय किंमत मोजणे योग्य आहे? अशा द्वेषपूर्ण एकत्रीकरणात आप खरेच भाजपाला मागे टाकू शकेल आणि किती काळासाठी?

आपने या सर्व मुद्दयांवर सखोल विचार करणे आवश्यक आहे, कारण, या प्रश्नांच्या उत्तरांतून केवळ आप एखाददोन राज्ये जिंकणार की नाही हे स्पष्ट होणार नाही, तर आपल्या वैविध्यांचा आदर राखणाऱ्या समावेशक भारताची कल्पना जिंकणार की हरणार हेही यातून स्पष्ट होणार आहे.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0