काँग्रेस अध्यक्षाची प्रक्रिया सुरू; राहुल गांधींसंदर्भात अद्याप अनिश्चितता

काँग्रेस अध्यक्षाची प्रक्रिया सुरू; राहुल गांधींसंदर्भात अद्याप अनिश्चितता

नवी दिल्लीः काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून नियमित वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही चालू असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्र

आयाराम, घराणेशाही आणि आयारामांची घराणेशाही
भाजपचा पंढरपूर पॅटर्न यशस्वी होणार?
शिवराजसिंह यांना ज्योतिरादित्यांचेच आव्हान

नवी दिल्लीः काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून नियमित वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही चालू असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेसचा नवा अध्यक्ष येत्या २० सप्टेंबर रोजी निवडून येईल, असे पक्षाचे म्हणणे आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे संचालक मधुसुदन मिस्त्री यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकारिणी समितीकडून लवकरच काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुकांची तारीख जाहीर होणार असून ही प्रक्रिया २१ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या दरम्यान होईल असे मिस्त्री यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस कार्यकारिणी समितीकडून या आधीच गट समिती, प्रदेश काँग्रेस समितीच्या निवडणुका झाल्या आहेत, त्याच बरोबर जिल्हा समिती अध्यक्ष व कार्यकारिणीच्याही निवडणुका झाल्या आहेत, आता काँग्रेसचा अध्यक्षाची निवड बाकी असल्याचे मिस्त्री यांचे म्हणणे आहे. आता काँग्रेस कार्यकारिणी समितीवरील सदस्यांची अंतिम यादी तयार होईल व त्यांच्याकडून अध्यक्ष निवडला जाणार आहे. या संदर्भातील तारीख लवकरच जाहीर होईल. पक्षाच्या सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २० सप्टेंबर पर्यंत आपला नवा अध्यक्ष असावा असे निर्देश दिले आहेत, असेही मिस्त्री म्हणाले.

राहुल गांधी अध्यक्षपदासाठी तयार नाहीत ?

दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी तयार नसल्याचेही वृत्त दिल्लीत चर्चिली जात आहेत. राहुल गांधी यांच्याकडून तसा कोणताही प्रस्ताव वा त्यांचा कल दिसत नसल्याचेही वृत्त आहे. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व काँग्रेस कार्यकारिणी समितीला काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे असे वाटत आहे पण त्या संदर्भात राहुल गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0