उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

उद्धव ठाकरे यांचे भावनिक आवाहन

मुंबई : समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र शिवसेनेवर घाव घालू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले. मु

दोस्त की नवा सहकारी, भारतासमोर आव्हान
आंग सान सू की यांना ४ वर्षाचा तुरुंगवास
ब्रिटन, रशियाकडून कोविड लसीकरण मोहिमेस परवानगी

मुंबई : समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र शिवसेनेवर घाव घालू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मिडियावरून संवाद साधला.

ते म्हणाले, सूरत आणि दुसरीकडे जाऊन नव्हे तर समोर येऊन सांगा, मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी राजीनामा दिल्यानंतर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल, तर मी जायला तयार आहे. मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांना असे वाटत आहे, की मी शिवसेनेचे नेतृत्त्व करण्यास लायक नाही, तर मी तेही पद सोडण्यास तयार आहे. पद येते आणि जाते, ती आपली कमाई नाही. लोक आपल्या बद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे आहे.

ठाकरे म्हणाले, मे माझे मन घट्ट केले आहे. वर्षा बंगल्यावरून मातोश्रीवर जाण्यास तयार आहे. संख्या महत्त्वाची नाही. एकही आमदाराने माझ्या विरुद्ध मतदान केले तर ती  गोष्ट लाजिरवाणी असेल. त्यामुळे समोर या.

ते म्हणाले, शरद पवार आणि सोनिया गांधी यानी विश्वास टाकला. मी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी या सगळ्यांनी सहकार्य केले. आज सकाळीही कमलनाथ आणि शरद पवार यांनी फोन करून पाठींबा दिला. त्यांनी मला पाठींबा दिला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको आहे. समोर येऊन बोला. मी लगेच राजीनामा देईल. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरत आहे. ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली त्या शिवसेनेवर घाव घालू नका.

मुख्यमंत्री यांच्याबद्दल ते भेटत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. त्याविषयी बोलताना, ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रिया झाल्याने भेटू शकत नव्हतो. आता काम सुरू केले आहे. मात्र हिंदूत्व आणि शिवसेना हे एकमेकांमध्ये मिसळलेले शब्द आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेली नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: