उत्तर प्रदेशात आगामी टप्पे भाजपसाठी कठीण

उत्तर प्रदेशात आगामी टप्पे भाजपसाठी कठीण

लखनऊः उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांतील दोन टप्प्यातले झालेले मतदान पाहता भाजपला या निवडणूकात सपशेल पराभव पत्करावा लागणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ

अश्रुधूर, मोडक्या काठ्या, पॅलेट गोळ्यांची वसुली
अमित शाह यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अन्वयार्थ
लखीमपूर ट्विटमुळे वरुण गांधींना भाजप कार्यकारिणीतून डच्चू?

लखनऊः उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांतील दोन टप्प्यातले झालेले मतदान पाहता भाजपला या निवडणूकात सपशेल पराभव पत्करावा लागणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या. या चर्चेने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले होते. तरीही भाजपला आगामी पाच टप्पे आपल्याला या निवडणुकांत हात देऊ शकतात व त्या जोरावर आपण पुन्हा सत्ता राखू शकते असे वाटत आहे.

भाजपला तिसरा, चौथा व पाचवा टप्पा या साठी महत्त्वाचा वाटत आहे की या टप्प्यात ज्या मतदार संघात मतदान होणार आहे त्यापैकी तीन चतुर्थांश मतदारसंघात मुस्लिम, यादव, असंतुष्ट जाट हे घटक प्रभावशाली असले तरी ते समाजवादी पार्टीच्या बाजूला उभे राहणार नाही असे भाजपला वाटते. त्याच बरोबर मध्य उ. प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये भाजप प्रभावशाली असल्याने त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी समाजवादी पार्टीला अन्य घटक दलाची मदत घेणे क्रमप्राप्त आहे. पण येथे समाजवादी पार्टीसोबत एकही राजकीय पक्ष नसल्याने त्यांची थेट लढत भाजपशी आहे.

रविवारच्या तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत मतदानाची टक्केवारी ५७.४४ इतकी होती. ही टक्केवारी भाजपसाठी अनुकूल आहे, असे वाटत नाही.

या पुढची सहावी व सातवी फेरी तशी चुरशीची आहे. या फेरीत समाजवादीच्या बाजूला ओम प्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, भाजपमधून बंडखोरी केलेले स्वामी प्रसाद मोर्य व अन्य पक्ष आहेत. या दोन टप्प्यात बसपाचे तगडे आव्हान भाजपला आहे.

तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यात ५९ मतदारसंघात आपले वर्चस्व पुन्हा राखणे हे भाजपपुढचे आव्हान आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने या जिल्ह्यात ४९ व सपाने ९ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ १ व बसपाच्या खात्यावर शून्य जागा होत्या. पण या मतदारसंघात बसपाची मतदान टक्केवारी चांगली दिसून आली होती.

या १६ जिल्ह्यात इटाह, मैनपुरी, कनौज, इटावाह, फिरोजपूर येथे यादव व मुस्लिम संख्या मतदार मोठा असून तो सपाचा भाग मानला जातो. अन्य हाथरस, कासगंज, फरुखाबाद, अरैय्या, कानपूर ग्रामीण, कानपूर, जलाऊन, झांसी, ललितपूर, हमीरपूर व महोबा या जिल्ह्यातली भाजपची कामगिरी चांगली आहे.

मतदारांमध्ये मिसळले असता असे लक्षात येते भाजपला या १६ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बसीचा सामना करावा लागणार आहे. या जिल्ह्यांमधील प्रमुख मतदार शेतकरी व मजूर असून त्यांचा कल जातीय समीकरणावर अवलंबून आहे.

उ. प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये सर्वच विरोधी पक्षांनी सर्व सामान्यांना भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, पेट्रोल दरवाढ, शेती प्रश्न यांना प्राधान्य दिले गेले. या पक्षांच्या जाहीरनाम्यात या प्रश्नांना समाविष्टही करण्यात आले होते. पण भाजपने आपला प्रचार राज्यातील कायदा-सुव्यवस्था किती सुधारली यावर दिला. सपाच्या राजवटीत अभय मिळालेल्या माफियांचे राज्य आम्ही उद्धवस्त केले असे भाजपचे म्हणणे आहे. त्याच बरोबर आदित्य नाथ सरकारने गोरगरीबांना वाटलेले रेशनवरचे मोफत धान्य, राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, व अन्य कल्याणकारी योजना यांच्यावर भाजपचा भर आहे.

आगामी फेऱ्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या दिग्गजांची परीक्षा आहे. यातील अधिक नेते आदित्य नाथ सरकारमध्ये मंत्रीही होते.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: